शाहिन, मुझम्मिलने बॉम्बसाठी ‘अल-फलाह’तून चोरले केमिकल

नवी दिल्ली : बॉम्ब बनवण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून रसायने चोरली होती, असा कबुली जबाब फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातील डॉ. शाहिन सईद आणि डॉ. मुझम्मिल यांनी ‘एनआयए’समोर चौकशीदरम्यान दिला. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), जम्मू-काश्मीर पोलीस, दिल्ली गुन्हे शाखा, हरियाणा एटीएस अशा अनेक पथकांकडून फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठातून चालवल्या जाणाऱ्या ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’ची चौकशी करण्यात येत आहे. या विद्यापीठाच्या लॅबोरेटरीतून बॉम्ब बनवण्यासाठी केमिकल चोरली होती. त्यांचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी कसा करायचा, याचे मार्गदर्शन मिळवले होते, असेही परवेज मुझम्मिलने कबूल केले, तर डॉ. शाहिनने ती महिलांच्या आत्मघातकी पथकाची उभारणी करत असल्याची माहिती दिली. दरम्यान, तपास यंत्रणांतील अन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर आत्मघातकी बॉम्बर्सची एक टीम तयार करत होता. डॉ. उमर नबी स्वतःसारख्या अधिक आत्मघाती हल्लेखोरांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत होता. तो तरुणांचे ब्रेन वॉश करण्यासाठी त्यांना प्रेरणादायी व्हिडीओ तयार करून पाठवत होता. हे व्हिडीओ ११ व्यक्तींना पाठवण्यात आले होते, त्यापैकी सात काश्मिरी होते आणि ते सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे विद्यापीठाशी जोडलेले होते. उर्वरित चारजण उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमधील असल्याचे सांगितले जाते.


दिल्ली स्फोट प्रकरणी चार आरोपींना अटक


दिल्लीत १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी चार प्रमुख आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या सहा झाली आहे. पटियाला हाऊस कोर्टाच्या जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या प्रोडक्शन ऑर्डरवर एनआयएने जम्मू आणि काश्मीरमधून चारही आरोपींना ताब्यात घेतले. चौघांनाही १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी डॉ. मुजम्मिल शकील गनई, अनंतनाग येथील रहिवासी डॉ. आदिल अहमद राथेर, लखनऊ येथील रहिवासी डॉ. शाहीन सईद आणि शोपियां येथील रहिवासी मुफ्ती इरफान अहमद वागे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांनी दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आली आहे. एनआयएने आधीच दोन इतर आरोपींना अटक केली आहे.

Comments
Add Comment

शिक्षकांसह मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे शौर्यची आत्महत्या

शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत नवी दिल्ली (वृत्तसंस्था): प्राचार्या आणि

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,

सायबर फसवणुकींचे नवे डावपेच: सर्वसामान्यांवर वाढता धोका त्यापासून कसे वाचाल फेडेक्सने काय म्हटले? वाचा ....

मुंबई: सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत आणि घोटाळेबाज आता अत्यंत