रायगड : पुण्यावरून कोकणात पर्यटनासाठी निघालेल्या चार मित्रांवर रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाल्याने काळाने घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे पर्यटक २० दिवसांपूर्वीच घेतलेली नवीन 'थार' (Thar) कार घेऊन कोकणात फिरायला निघाले होते. मंगळवारी रात्री हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. ही थार कार घाटात थेट ५०० फूट खोल दरीत कोसळली. दुर्घटनेची माहिती लगेच मिळाली नव्हती. नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर आज ही घटना उघडकीस आली. या भीषण दुर्घटनेत कारमधील ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीमकडून तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि थारमधील इतर व्यक्तींसाठी शोध मोहीम राबविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्यातील या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत ...
चालक नियंत्रण सुटल्याने ५०० फूट खोल दरीत कोसळली
या अपघातात ६ प्रवासी घेऊन जाणारी एक थार (Thar) कार ५०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात परवा मंगळवारी रात्री झाला होता, पण ही घटना लगेच उघडकीस आली नाही. कारमधील प्रवाशी बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात सापडले. त्यानंतर आज या घटनेचा तपास सुरू झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याचे प्राथमिक अंदाजात स्पष्ट झाले आहे. दुर्घटनास्थळी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. मात्र, उर्वरित २ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील सर्व प्रवासी पुरुष असल्याची माहिती मिळाली आहे. सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून या अपघातातील बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सध्या घटनास्थळी पंचनामा करण्याचे आणि रेस्क्यू ऑपरेशनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रथमदर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चार मृतदेह आढळून आले असून, ते दरीतून वर आणण्याचे काम सुरू आहे. अपघाताच्या ठिकाणच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी ड्रोनद्वारे परिसराची तपासणी (Drone Surveillance) केली जात आहे. बचाव पथक दोरखंड, क्रेन आणि इतर अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने हे अत्यंत जोखमीचे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. या दुर्घटनेबद्दल अधिक माहिती देताना माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सांगितले की, "वाहनात आणखी प्रवासी होते का, याचा तपासही सुरू आहे." दरम्यान, आढळून आलेल्या मृतांची ओळख पटविण्याचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.






