प्रतिनिधी: बँक खातेदारांसाठी एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे. आता कॅपिटल गेन खात्यासाठी सरकारी पीएसयु बँकांमध्ये खाते असणारे अनिवार्य असणार नाही. यापूर्वी असलेला हा नियम रद्दबादल ठरवून आता नव्या नियमानुसार, खाजगी बँकांमध्येही कॅपिटल गेन खाते ग्राहकांना काढता येणार आहे. १९ नव्या बँकाना वित्त मंत्रालयाने परवानगी दिली असल्याचे पत्रक मंत्रालयाने प्रकाशित केले आहे. या नव्या नोटीफिकेशननुसार, आयसीआयसीआय बँक, अँक्सिस बँक, एचडीएफसी बँक, सिटी युनियन बँक, फेडरल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, करूर वैश्य बँक, आरबीएल बँक, सीएसबी बँक, येस बँक, बंधन बँक, धनलक्ष्मी बँक, साऊथ इंडियन बँक, कर्नाटका बँक , इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, जम्मू अँड काश्मीर बँक या बँकांना हे खाते उघडायची परवानगी दिली आहे. त्यामुळे या नव्या खात्यात आता मुदत ठेवी ठेवता येणार आहे.
माहितीनुसार, ग्रामीण बँकावर मात्र हे खाते न उघडण्यासासंबंधी निर्णय कायम राहतील. याशिवाय कॅपिटल गेन नियमावलीत कलम ५४ GA टाकण्यात आले आहे. त्यामुळे एलटीसीजी (Long Term Capital Gains LTCG) या नव्या तरतुदीनुसार जर तुम्ही नव घर घेतले असेल किंवा अथवा आपला भूखंड विकला किंवा खरेदी केला तसेच संबंधित मालमत्ता एका वर्षाच्या आता खरेदी विक्री केल्यास अथवा मालमत्ता घेतल्यापासून दोन वर्षांच्या आता भरावा लागणारा आता माफ केला जाऊ शकतो.
कॅपिटल गेन टर्म डिपॉझिट खाते किमान १००० च्या नव्या नियमानुसार, ठेवीसह आणि त्यानंतर १ रूपयाच्या पटीत उघडता येते. कमाल रकमेची मर्यादा नाही. मूळ मालमत्तेच्या ट्रान्स्फर केलेल्या तारखेपासून कमाल कालावधी २ ते ३ वर्षांपेक्षा जास्त नसेल तर मॅच्युरिटी पर्यायासाठी किमान कालावधी ७ दिवसांचा असेल आणि उत्पन्न पर्यायासाठी ६ महिने असेल. कालावधीनंतर एफडी आपोआप बंद होईल त्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करावे लागणार नाहीत.
जर मुदतपूर्व पैसे काढाल तर १% दंडात्मक व्याज आकारले जाणार आहे .या ठेवीवर कोणतीही कर्ज सुविधा उपलब्ध नाही. मुदत ठेव नॉन-फंड-आधारित किंवा कोणत्याही प्रकारच्या फंड-आधारित सुविधांसाठी तारण म्हणून स्वीकारली जाऊ शकत नाही असे नोटिफिकेशनुसार स्पष्ट करण्यात आले आहे.






