Thursday, November 20, 2025

मुंबईतील १० पैकी जवळपास ९ एसएमबी एआयला प्राधान्‍य देतात: लिंक्‍डइन संशोधन

मुंबईतील १० पैकी जवळपास ९ एसएमबी एआयला प्राधान्‍य देतात: लिंक्‍डइन संशोधन

मुंबई: मुंबईतील लघु व मध्‍यम आकाराचे व्‍यवसाय (एसएमबी) त्‍यांच्‍या आतापर्यंतच्‍या सर्वात आत्‍मविश्वासपूर्ण दशकामध्‍ये प्रवेश करत आहेत. नवीन लिंक्‍डइन (LinkedIn) संशोधनामधून निदर्शनास येते की, मुंबईतील १० पैकी जवळपास ९ (८९%) एसएमबी एआय अवलंबनामध्‍ये गुंतवणूक करत आहेत किंवा एआय अवलंबनाचे नियोजन करत आहेत. तंत्रज्ञान प्रयोगावरून पायाभूत सुविधेपर्यंत पोहोचले आहे. यासोबत, ८७% एसएमबी धोरणकर्त्‍यांना पुढील १२ महिन्‍यांमध्‍ये व्‍यवसाय वाढीची अपेक्षा आहे, ज्‍यामधून क्षेत्र आशावादी असण्‍यासोबत स्‍मार्ट सिस्‍टम्‍स, कुशल टॅलेंट आणि विश्वसनीय डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍ससह पुन्‍हा विकसित होईल असे दिसून येते.

मुंबईतील एसएमबींसाठी उत्‍क्रांती पर्याय नसून अस्तित्‍व टिकवण्‍याचे साधन -

एसएमबींचा तत्‍परतेवर विश्वास असला तरी एआयबाबत आता फक्‍त चर्चा केली जात नसून ते विकासासाठी नवीन बेसलाइन बनले आहे. संशोधनामधून निदर्शनास येते की, मुंबईतील ५९ एसएमबी मार्जिन्‍सच्‍या संरक्षणासाठी महत्त्वाचे म्‍हणून ऑपरेशनल कार्यक्षमतेला महत्त्व देतात, ५७% एसएमबी स्‍पर्धात्‍मक राहण्‍यासाठी आवश्‍यक म्‍हणून एआय आणि ऑटोमेशनला प्राधान्‍य देतात आणि ५१% एसएमबींचे मत आहे की, डिजिटल परिवर्तन अस्तित्‍व कायम राहण्‍यासाठी महत्त्वाचे आहे.

लिंक्‍डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर कुमारेश पट्टाबिरामण (Kumaresh Pattabiraman, Country Manager, LinkedIn India) म्‍हणाले आहेत की,'मुंबईतील एसएमबी स्‍मार्टपणे काम करत आणि अधिक धोरणात्‍मकरित्‍या एआयमध्‍ये गुंतवणूक करत व्‍यवसाय विकास मानकांना नव्‍या उंचीवर घेऊन जात आहेत. उद्योजक व्‍यवसाय निर्माण करण्‍याच्‍या पद्धतींना आव्‍हान देत आहेत, एआयचा वापर करत कार्यक्षमतेला चालना देत आहेत, क्षमता वाढवण्‍यासाठी कुशल व्‍यक्‍तींना हायर करत आहेत आणि विश्वसनीय डिजिटल परिसंस्‍थांच्‍या माध्‍यमातून त्‍यांची बाजारपेठेतील उपस्थिती वाढवत आहेत. लिंक्‍डइनमध्‍ये आम्‍ही विकासाच्‍या या पुढील टप्‍प्‍याला सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जेथे प्रत्‍येक उद्योजकाला एकाच ठिकाणी योग्‍य नेटवर्क, योग्‍य ग्राहक आणि योग्‍य टॅलेंटसह सक्षम करत आहोत, ज्‍यामुळे ते आजच्‍या वाढत्‍या डिजिटल-केंद्रित अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये आत्‍मविश्वासाने प्रगती करू शकतील.'

एआय विकासासाठी नवीन ऑपरेटिंग सिस्‍टम -

एआय मुंबईतील एसएमबीच्‍या हायर, विपणन व विकास करण्‍याच्‍या पद्धतींमागील प्रेरक स्रोत बनले आहे. जवळपास सर्वेक्षण करण्‍यात आलेले सर्व व्‍यवसाय म्‍हणतात की, ते कार्यप्रवाह स्‍वयंचलित करण्‍यासाठी (८८%), विश्‍लेषण व व्‍यवसाय उत्‍कृष्‍टता दृढ करण्‍यासाठी (८८%) आणि कर्मचाऱ्यांना अधिक कुशल करण्‍यासाठी (८७%) एआयचा वापर करतात किंवा एआयचा वापर करण्‍याचे नियोजन करत आहे.

हायरिंग मॉडेल्‍सना पुन्‍हा निर्माण करण्‍यात येत आहे, पदवींपेक्षा कौशल्‍यांना महत्त्व दिले जात आहे. शहरातील अर्ध्‍याहून अधिक एसएमबी आता पारंपारिक पात्रतांच्‍या तुलनेत नेतृत्‍व व टीम व्‍यवस्‍थापन (५८%), समस्‍या निवारण व महत्त्वपूर्ण विचारसरणी (५५ टक्‍के) आणि डिजिटल साक्षरता व एआय निपुणता (५३%) या गुणांना महत्त्व देतात. ही कौशल्‍ये असलेल्‍या टॅलेंटचा शोध घेण्‍यासाठी ५३% एसएमबी आधीच एआय हायरिंग टूल्‍सचा वापर करत आहेत, ज्‍यामधून सुधारित उमेदवार दर्जा आणि उच्‍च सहभाग दिसून येतो.

मुंबईमध्‍ये विपणन (Marketing) व विक्री देखील उत्‍कृष्‍टता-संचालित बनत आहेत. ६९% एसएमबी एआय मार्केटिंग टूल्‍सचा वापर करत आहेत, त्‍यांच्‍यापैकी ९४% एसएमबी याकरिता त्‍यांचा जवळपास अर्धा बजेट वापरत आहेत. ६६% एसएमबी आता स्‍पष्‍ट लक्ष्‍य आणि ऑटोमेटेड फॉलोअप्‍ससाठी विक्रीमध्‍ये एआयवर अवलंबून आहेत, ज्‍यामुळे त्‍यांना मोठ्या अत्‍याधुनिक उद्योगांसह काम करता येते.

स्‍केलरचे चीफ मार्केटिंग ऑफिसर राहुल कार्तिकेयन (Rahul Karthikeyan, Chief Marketing Officer, Scaler) म्‍हणाले आहेत की,'स्‍केलरच्‍या अलिकडील मोहिमांनी अचूक ग्राहक लक्ष्‍य आणि डेटा-संचालित ऑप्टिमायझेशनच्‍या माध्‍यमातून उत्तम कामगिरी केली आहे. प्रायोजित कनेन्ट, विशेषत: व्‍हर्टिकल फॉर्मेट्सनी इतर चॅनेल्‍सवरील स्थिर फॉर्मेट्सच्‍या तुलनेत २०% उच्‍च लीड-टू-पेमेंट रूपांतरण दिले. ऑगस्‍टमध्‍ये लिंक्‍डइनने जवळपास ७० ते ८० नवीन पेमेंट्स निर्माण केले, ज्‍यामध्‍ये रिटर्न ऑन स्‍पेण्‍ड (आरओएस) २.२ आहे. आमची या उच्‍च-प्रभावी चॅनेलला अधिक विकसित करण्‍याची, तसेच प्रति विक्री खर्चासहित कार्यक्षमता कायम ठेवण्‍याची योजना आहे.'

विश्वास नवीन स्‍पर्धात्‍मक फायदा -

एसएमबी झपाट्याने एआयचा अवलंब करत असले तरी विश्वास कोणावर ठेवावा याबाबत सतर्कता राखत आहेत. ९६% एसएसमबी म्‍हणतात की, खर्च किंवा सोयीसुविधेपेक्षा विश्वसनीयता महत्त्वाची आहे. ते डेटा सुरक्षा (८३%), विनासायास एकीकरण (७८%) आणि व्‍याजदराबाबत (ROI) स्‍पष्‍टता (७६%) यांना अधिक प्राधान्‍य देत आहेत. या बदलांमधून स्‍मार्ट अधिक स्थिर एसएमबी परिसंस्‍थेचा (Ecosystem) उगम दिसून येतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा