Friday, January 2, 2026

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स अँटी-नार्कोटिक्स सेलच्या वतीने जारी करण्यात आले असून आज सकाळी १० वाजता अँटी-नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटसमोर चौकशीसाठी हजर राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.दाऊद इब्राहिम टोळीतील प्रमुख सदस्य ड्रग्ज किंगपिन सलीम डोला याचा निकटवर्तीय सहकारी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या चौकशीमध्ये त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितलं की, तो भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित करतो आणि त्या पार्ट्यांना ड्रग्ज पुरवतो.

https://x.com/ANI/status/1991165255716921348?s=20

शेखच्या पार्टीत कोणाकोणाचा सहभाग?

मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख आयोजित पार्टीमध्ये दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह,अभिनेत्री नोरा फतेही,श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर सहभागी झाले होते. पोलिसांनी मुंबईतील एका न्यायालयासमोर सादर केलेल्या रिमांड अर्जात असेही म्हटले आहे की चित्रपट निर्माते अब्बास-मस्तान यांच्यासह रॅपर लोका, ओरी आणि एनसीपी नेते जिशान सिद्दीकी यांसारख्या काही इतर व्यक्ती देखील उपस्थित होत्या.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मित्र सलीम डोला हा ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. या सिंडिकेटनं देशभरातील सात ते आठ राज्यांमध्ये मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या ड्रग्जचा पुरवठा केला आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही त्यांची तस्करी केली. मुंबई गुन्हे शाखेव्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय देखील या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहे. या ड्रग्ज तस्करीतून मिळणारे पैसे हवाला आणि रिअल इस्टेटद्वारे लाँडरिंग केले जात असल्याचा ईडीला संशय आहे. मुंबई गुन्हे शाखा लवकरच या सर्व व्यक्तींना समन्स बजावेल आणि त्यांचे जबाब नोंदवेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >