Thursday, November 20, 2025

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे कर्नाटकातही वेगळ्याच राजकारणाची गडबड सुरू आहे. गलुरू येथे इंदिरा गांधी जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात डीके शिवकुमार यांनी महत्त्वाचे विधान केले. ज्याचे अनुमान यापूर्वी शिवकुमार यांनी स्वत: डावलून टाकले होते. ते म्हणाले की, मी या पदावर कायम नाही राहू शकत. या पदावर राहून मला साडेपाच वर्षे झाली आहेत. यावर्षी मार्चमध्ये सहा वर्षे पूर्ण होतील. कोणतेच पद नेहमीसाठी नसते."

आजपर्यंत अनेकदा डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतू या चर्चांना खुद्द डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूर्णविराम दिला होता. मात्र आता डीके शिवकुमार यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा मुख्यमंत्री पदाचा विषय केंद्रस्थानी आला आहे. मुख्यमंत्री पदासोबत शिवकुमार आता लवकरच कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे पद सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे डीके शिवकुमार यांनी स्वतः सांगितले की, आता या पदासाठी दुसऱ्या नेत्यांनाही संधी दिली गेली पाहीजे. याचबरोबर ते हेही म्हणाले की ते काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते म्हणून कायम राहतील.

बिहार विधानसभेच्या निकालानंतर देशभरात बऱ्याच राजकीय घटनांना वेग आला. यानंतर कर्नाटकातील डीके शिवकुमार यांच्या विधानानंतर कर्नाटकातील राजकारणात मोठा धमाका होणार का? याबाबत चर्चांना वेग आला आहे. डीके शिवकुमार हे कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री आहेत.

Comments
Add Comment