Thursday, November 20, 2025

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन
काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं काही भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. नेपाळमध्ये ८-९ सप्टेंबरला पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात २१ जणांचा मृत्यू झाला होता. आता ७० दिवसांनी नेपाळमध्ये पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय सीमेला लागून असलेल्या नेपाळच्या सर्व जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जेन झी आणि सीपीएन-यूएमएल (कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनायटेड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाल्यामुळे परिस्थिती बिघडली आहे. यूएमएलचे महासचिव शंकर पोखरेल आणि युवा नेते महेश बस्नेत सरकार विरोधात भाषण देण्यासाठी एका कार्यक्रमाला जात होते. ते कार्यक्रमासाठी सेमरा शहरात आल्याची माहिती मिळताच तरुणाई रस्त्यावर आली. जेन झी आणि सीपीएन-यूएमएल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. तणाव वाढला आणि दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. तोडफोड आणि जाळपोळ झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दुपारी १ ते रात्री ८ पर्यंत प्रशासनानं संचारबंदी लागू केली. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बुद्ध एअरलाईन्सनं त्यांची देशांतर्गत सर्व उड्डाणं रद्द केली. सेमरामधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. स्थानिक प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलली आहेत. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ठीक असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
Comments
Add Comment