लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यानंतर झालेल्या दिल्ली बॉम्ब स्फोटामुळे भारत सरकार दहशतवादाला कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण यापूर्वीच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा भारत पाकिस्तान युद्ध सुरू होणार असल्याचे विधान केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लाल किल्ला बॉम्ब स्फोटाच्या प्रकरणात पाकिस्तानचे नाव समोर येत आहे. या हल्ल्याच्या सखोल तपासणीमधून लक्षात आले की, हा खूप मोठा घातपात होता. ज्याचे रॅकेट मोठे होते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही असा इशारा दिला आहे.
दरम्यान, भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, " ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर होता आणि हा भाग ८८ तासांनंतर संपला. द्विवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले की जर पाकिस्तानने आम्हाला संधी दिली तर भारत त्यांना एका जबाबदार राष्ट्राने आपल्या शेजाऱ्यांशी कसे वागावे याबद्दल धडा शिकवेल."
मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स अँटी-नार्कोटिक्स सेलच्या वतीने जारी ...
या पार्श्वभूमीवर, एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले की, "आम्ही भारताकडे दुर्लक्ष करत नाही. मी युद्ध किंवा भारताकडून कोणत्याही शत्रुत्वाच्या रणनीतीची शक्यता नाकारू शकत नाही. यामध्ये सीमापार घुसखोरी किंवा हल्ल्यांचा समावेश असू शकतो. त्यामुळे पाकिस्तानला पूर्णपणे सतर्क राहावे लागेल."
भारताचा सर्वात मोठा शत्रू देश असलेला पाकिस्तान सतत काहीना काही कुरघोड्या करत असतो. मात्र आता भारत कधीही दिल्ली हल्ल्याचे उत्तर देऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानच्या मनात निर्माण झाली असल्याचे आसिफ यांच्या विधानांवरून लक्षात येते.






