गुरुग्राम: एसीएमई सोलर होल्डिंग्ज लिमिटेडने गुजरातमधील सुरेंदरनगर येथे असलेल्या त्यांच्या १०० मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पापैकी अतिरिक्त १६ मेगावॅट प्रकल्प कार्यान्वित केला असल्याचे त्यांनी आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे. यापूर्वी प्रकल्पाचा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला होता. २८ मेगावॅटच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्प सुरु झाल्यानंतर आता पुढील विस्तारीत प्रकल्पाचे काम सुरू झाले असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (GDA) आणि पश्चिम गुजरात विज कंपनी लिमिटेड (PGVL) अधिकाऱ्यांनी प्रकल्प सुरू झाल्याची साक्ष दिली असून अधिकृतपणे या प्रकल्पाची पुष्टीही केली गेली असल्याचे कंपनीने म्हटले.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,लवकरच औपचारिक प्रमाणपत्र जारी केले जाण्याची अपेक्षा आहे. नुकत्याच कार्यान्वित झालेल्या प्रकल्पाची क्षमता टप्प्याटप्प्याने (Phase Wise) कार्यान्वित होणाऱ्या १०० मेगावॅटपैकी ४४ मेगावॅटवर पोहोणार आहे. या टप्प्यामुळे एसीएमई सोलरची एकूण कार्यान्वित क्षमता आता २९३४ मेगावॅटपर्यंत वाढली आहे.अलीकडेच, वीज खरेदी करार (PPA) अंतर्गत फोर्स मॅज्योर इव्हेंट्सना मान्यता मिळाल्यानंतर, गुजरात वीज नियामक आयोगाने (GERC) या प्रकल्पाला त्याच्या शेड्यूल्ड कमर्शियल ऑपरेशन डेट (SCOD) मध्ये वाढ दिली. सुधारित एससीओडी (SCOD) तारीख ५ मार्च २०२६ आहे आणि अधिकृत माहितीप्रमाणे पहिल्या दोन टप्प्यात ४४ मेगावॅट क्षमतेसह हा प्रकल्प लवकर कार्यान्वित करण्यात आला आहे.
या पवन ऊर्जा प्रकल्पाला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) द्वारे वित्तपुरवठा करण्यात आला आहे आणि SANY च्या ४ मेगावॅट टर्बाइन तैनात करून इन-हाऊस ईपीसी (EPC) द्वारे बांधण्यात आले आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ACME इको क्लीन आणि गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड यांच्यात स्वाक्षरी केलेल्या २५ वर्षांच्या वीज खरेदी कराराद्वारे (PPA) विकली जाईल. एसईएमई सोलार होल्डिंग्ज लिमिटेड ही अक्षय ऊर्जा (Renewable Energy) कंपनी आहे. सौर, पवन, साठवणूक, FDRE आणि हायब्रिड सोल्यूशन्सचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे आणि त्याची ऑपरेशनल क्षमता २९३४ मेगावॅट असून ४४५६ मेगावॅटची बांधकाम करण्याजोगी क्षमता असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले होते.






