आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एस. सरताज उद्दीन असे बोगस डॉक्टरचे नाव असून गेल्या २५ वर्षांपासून त्याने हजारो लोकांवर उपचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस डॉक्टरकीचे भांडे फुटल्याने सरताज सध्या फरार झाला आहे. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस आसामध्ये संशयित ठिकाणांवर छापे टाकत आहेत.
२००१ ते २०२५ या कालावधीत सरताज उद्दीननं अनेकांवर उपचार केले. पण त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा पदवी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तब्बल २५ वर्षांपासून समाजात उजळ माथ्याने फिरणारा डॉक्टर बोगस असल्याचे समजताच त्याच्याकडून उपचार घेतलेल्यांना चिंता वाटू लागली आहे. तर खोटी ओळख सांगून जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांबाबत प्रशासकीय यंत्रणांना एकदा पण संशय आला नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आसाम काऊन्सिल ऑफ मेडिकल रजिस्ट्रेशनला सरताज उद्दीन विरोधात तक्रार मिळाली होती. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष सरताजच्या दवाखान्याकडे गेल्याने बोनगायगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. अडीच दशकांच्या कालावधीत सरताजने बोनगायगावमध्ये बहुमजली इमारत उभारून स्वत:चा दवाखाना बिनदिक्कतपणे सुरु केला. सरताज उद्दीन एवढा सराईत बोगस डॉक्टर होता की, त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांना त्याच्याबद्दल जराही संशय आला आहे.
पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी पेटवत आहेत. मात्र थंडीच्या दिवसात पुणे ...
दरम्यान आसामच्या काचर जिल्ह्यात २०२५ च्या सुरुवातीला प्रशासनाने बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम चालू केली होती. बोगस आणि अपात्र डॉक्टरांची धरपकड यावेळी करण्यात आली. ज्यात बोगस डिग्रीच्या आधारे गेल्या १० वर्षांत ५० सी सेक्शन करणाऱ्या एका डॉक्टरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.






