Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे. तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या (Malegaon Crime News) केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी घडली. गावातील विजय संजय खैरनर (वय २४) या नराधमाने प्रथम या चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली आहे. या भयानक घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी तत्काळ सूत्रे हलवली आणि आरोपी विजय खैरनार याला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, जेव्हा पीडित मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आणला गेला, तेव्हा कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे माणुसकीला काळिमा फासल्याची भावना व्यक्त होत आहे.



आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी


प्राथमिक तपासानुसार, आरोपी विजय खैरनार आणि पीडित मुलीचे वडील यांच्यात एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग आरोपीच्या मनात होता. हाच राग मनात ठेवून या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत हे सैतानी कृत्य केले आणि तिची निर्घृण हत्या केली. पोलीसानी या प्रकरणी तातडीने आरोपीला अटक केली आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या काळात कसून तपास करणार आहेत. या अत्यंत संवेदनशील प्रकरणी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. या केसचा निकाल जलदगतीने लागावा यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन, सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना ही केस लढवण्याकरिता नेमण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या आश्वासनामुळे नागरिकांना न्याय मिळण्याची आशा वाढली आहे.



लासलगाव येथील सुवर्णकार समाजाचा शिवाजी चौकातून मूक मोर्चा


नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ अनेक सामाजिक गट रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने आज मूक मोर्चा काढून आपला तीव्र संताप व्यक्त केला. लासलगाव येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत शांततेत हा मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी महिलांनी अत्यंत ठाम मागणी केली की, आरोपीवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरतील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीतून जनतेचा रोष आणि चिमुकलीला न्याय मिळवण्याची तळमळ स्पष्टपणे दिसून येते. दरम्यान, या मागणीला पाठिंबा देत ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीनेही लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले असून, त्यांनीही आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे.

Comments
Add Comment

टीईटी सक्तीतून जुन्या शिक्षकांना मिळणार मुक्ती?

न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारच्या हालचालींना वेग पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीमुळे देशभरातील

माथेरानमध्ये धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लूट

कदम दाम्पत्याला दोरीने बांधून चोरटे फरार माथेरान (वार्ताहर): पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये टी स्टॉलवर

Pune School Holiday: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 19 जानेवारीला शाळांना सुट्टी, मुख्य रस्ते बंद,ग्रँड टूरमुळे शहरात...

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना रजा देण्यात

कोल्हापूर ACB मधील DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात; दोन जणांचा मृत्यू, चित्रदुर्गमध्ये उपचार सुरू

चित्रदुर्ग : कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाला

Nagpur News: नागपुरात आयकर विभागाची व्यापाऱ्यावंर मोठी कारवाई

नागपूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपूर शहरात आयकर विभागाने मोठी धडक कारवाई करत

कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली

कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर कानडेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नेसरी पोलीस ठाण्यातील