Wednesday, November 19, 2025

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे तो कसोटीच्या पहिल्या सामन्यात फारसा दिसला नाही. सामना झाल्यानंतर शुभमनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथून त्याला दाखल केल्याच्या दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला. बीसीसीआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

बीसीसीआयने ट्विटमध्ये सांगितले की, शुभमन वैद्यकीय उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो १९ नोव्हेंबरला संपूर्ण संघासोबत गुवाहाटीला जाणार आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर सतत देखरेख ठेवली जात असून उपचारांनुसार दुसऱ्या कसोटीतील त्याच्या सहभागाबाबत निर्णय घेतला जाईल. यामुळे शुभमन दुसऱ्या कसोटीमध्ये दिसणार की नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर शुभमन गिल खेळला नाही तर त्याची जागा कोण घेणार? कोलकातातील ईडन गार्डन्सवर झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार सरावाला सुरूवात केली आहे. ज्यात साई सुदर्शनने सराव करताना घाम गाळला आणि गिलच्या जागी या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता दिसली. मात्र आता गौतम गंभीर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >