मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली असून, या वादाचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली होती. या शक्तिप्रदर्शननंतर लगेचच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महायुतीतील आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. नाराजी दूर करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांकडून चर्चा झाली असली, तरी शिंदे गटाचे समाधान झाले नसल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, फडणवीस यांच्या भेटीनंतर अवघ्या दोनच दिवसांनी म्हणजेच आज, एकनाथ शिंदे थेट दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणि महायुतीतील जागावाटपावरून निर्माण झालेल्या तणावावर या दोन नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा झाली. या दिल्लीवारीमुळे महायुतीतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वादावर चर्चा केली. दिल्लीतील भेटीगाठी संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बिहार दौऱ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे, कारण बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन दोन सभा घेतल्या होत्या. बिहारमध्ये एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा दौरा राष्ट्रीय स्तरावर एनडीएच्या घटकांशी असलेले आपले संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा ठरू शकतो. महायुतीतील वाद आणि जागावाटपाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे यांचा दिल्ली आणि त्यानंतरचा बिहार दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मुंबई : वसईतील सातवली परिसरात अपहरण झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाचीसोबत प्रेमसंबंध असलेल्या ...
बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांची वाढती नाराजी
राज्याच्या सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या अंतर्गत कलह टोकावर पोहोचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाढती नाराजी घेऊन दिल्लीला रवाना झाल्याचे कळताच, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तातडीने वर्षा निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत प्रामुख्याने शिवसेना पक्षातील (शिंदे गट) मंत्री आणि एकनाथ शिंदे यांची वाढत असलेली नाराजी कशी दूर करायची, यावर सविस्तर चर्चा झाली. एवढेच नाही, तर एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत गेलीच, तर पुढील राजकीय पाऊल काय असावे या संभाव्य परिस्थितीवर देखील दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. त्यामुळे, महायुतीत तीनही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. राजकीय वातावरण तापलेले असताना, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मात्र नाराजीच्या चर्चांवर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. "आमच्यात कुठलीही नाराजी नाही, कुटुंब म्हटल्यावर थोडं फार होतच असतं," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. तर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी या नाराजीच्या चर्चांवर बोलणे पूर्णपणे टाळले होते.






