Wednesday, November 19, 2025

क्विक हीलने टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ लाँच सायबर क्राईमपासून आता संपूर्ण मुक्ती मिळणार

क्विक हीलने टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ लाँच सायबर क्राईमपासून आता संपूर्ण मुक्ती मिळणार

मुंबई: क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कंपनीने आज क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ च्‍या लाँचची घोषणा केली आहे. जगभरातील लाखो व्‍यक्‍तींच्‍या डेटाचे संरक्षण करताना गोपनीयता संरक्षण व आर्टिफिशियल इंटेलिजन्‍सला एकत्र करत भारतातील युजरला रोजच्या धोक्यापासून संरक्षण प्रदान करण्यासाठी ही नवी आवृत्ती जाहीर केली गेली असल्याचे कंपनीने लाँच दरम्यान स्पष्ट केले आहे. एकीकडे तंत्रज्ञान वाढत असताना दुसरीकडे सायबर घोटाळ्यांची प्रकरणेही दुपटीने वाढत आहेत. वाढती गरज लक्षात घेता सर्वसमावेशक सायबर धोके व फसवणूक प्रयत्‍नांविरोधात डिजिटल संरक्षण (Cyber Security) साठी कंपनीने नव्या अपग्रेडसह ही आवृत्ती जाहीर केली आहे.

व्‍हर्जन२६ चे लाँचचे टाईमिंगही महत्वाचे ठरेल आहे. अनेक अहवालातील माहितीनुसार वेळोवेळी फसवणूकीची प्रकरणे समोर आली असताना जेथे गोपनीयता नागरिकांसाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. रिपोर्टनुसार ८५% भारतीयांचा वैयक्तिक डेटा आधीच ऑनलाइन लीक झाला आहे व सायबरगुन्‍हेगार प्रतिमिनिट १.५ लाख रूपयांपेक्षा अधिक नुकसान करत आहेत. हे पाहता क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ या वाढत्‍या आव्‍हानांला सामोरे जाण्यासाठी नवी सेवा बाजारात आणण्यासाठी कंपनीने कंबर कसली आहे.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ संजय काटकर म्‍हणाले आहेत की,'क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ सायबरसुर‍क्षेच्‍या भविष्‍यामधील आमच्‍या धाडसी पुढाकाराला सादर करते. आम्‍ही भारतातील वापरकर्त्‍यांच्‍या संरक्षणाच्‍या ३० वर्षांना साजरे करत असताना ओळखले आहे की, जोखीम क्षेत्र सतत बदलत आहे. आजच्‍या आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी पारंपारिक अँटीव्‍हायरस संरक्षणापेक्षा अधिक मागणी आहे, जेथे एकाच सोल्‍यूशनमध्‍ये गोपनीयता, एआय आधारे संरक्षण आणि फसवणूक प्रतिबंधाचे संयोजन असलेल्‍या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची आवश्‍यकता आहे. व्‍हर्जन२६ सह आम्‍ही त्‍या कटिबद्धतेचे पालन करत आहोत. गोडीपडॉटएआय, एसआयए आणि अँटीफ्रॉडडॉटएआयचे एकीकरण यामधील आमच्‍या गुंतवणूकीमधून वापरकर्त्‍यांना दररोज सामना कराव्‍या लागणाऱ्या वास्‍तविक विश्वातील आव्‍हानांबाबत आम्‍हाला असलेली सखोल माहिती दिसून येते. हे लाँच सुरक्षित डिजिटल भारत घडवण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला दृढ करते, जेथे प्रत्‍येक नागरिक परिपूर्ण आत्‍मविश्वास आणि समाधानासह डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये सहभाग घेऊ शकतो.' असे म्हटले आहेत.

भविष्‍यसूचक आर्टिफिशियल इंटेलिजन्‍ससह प्रगत गोपनीयता टूल्‍सचे एकीकरण शक्तिशाली संरक्षण परिसंस्‍था (Ecosystem) तयार करते असा दावा कंपनीने केला आहे. धोक्‍यांना नुकसान करण्‍यापूर्वीच थांबवते व युजरचे त्‍यांनी आतापर्यंत सामना न केलेल्‍या धोक्‍यांपासून संरक्षण करते असा दावाही कंपनीने आपल्या नव्या उत्पादनाबाबत बोलताना दिला आहे.

क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ एसआयए (सिक्‍युरिटी इंटेलिजण्‍ट असिस्‍टण्ट) सह बाजारात आली आहे. हे एआय आधारित सुरक्षा सहाय्यक प्रत्‍येक डेक्‍स्‍टॉप अँटीव्‍हायरस सॉफ्टवेअरमध्‍ये डिझाइन करण्‍यात आले आहे. एसआयए सोप्‍या भाषेमध्‍ये सुरक्षेबाबत सूचना देत आणि त्‍यांचे निराकरण करत वापरकर्त्‍याच्‍या अनुभव सुकर करते असे कंपनीने म्हटले याशिवाय युजर फ्रेंडली, मानवी संवादाच्‍या माध्‍यमातून क्रमाक्रमाने प्रात्‍यक्षिक व जलद सोल्‍यूशन्‍स देते असे कंपनीने म्हटले. ज्‍यामुळे संभ्रम दूर होऊन मानवाला योग्‍य निर्णय घेता येणे आता सोपे होणार आहे.क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचे भविष्‍यसूचक धोका ओळखणारे तंत्रज्ञान गोडीपडॉटएआय हे प्रगत इंजिन लाखो धोक्‍यांना ओळखते आणि दररोज विकसित होत हल्‍ल्‍यांना होण्‍यापूर्वी थांबवते.

व्‍हर्जन२६ चे सुधारित डार्क वेब मॉनिटरिंग २.० युजरसाठी संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्‍यासाठी डार्क वेबचा वापर करणार आहे. त्यामुळेच आपोआपपणे ईमेल पत्त्यांना ओळखणाऱ्या युजरला आता त्‍यांच्‍या डिजिटल ओळखीचा गैरवापर, फसवणूक आणि आर्थिक नुकसानापासून सतत संरक्षण केले जात असल्याची शाश्वती मिळणार आहे.

अँटीफ्रॉडडॉटएआय आता क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ मध्‍ये एकीकृत (Integrated) करण्‍यात आल्याचे कंपनीने आपल्या फिचर्स विषयी स्पष्ट केले आहे हे वैशिष्‍ट्य खासकरून फसवी अँप्‍स, वेबसाइट्स, फसव्‍या यूपीआयमधील विनंत्‍या आणि बँकिंग फसवणूक करणाऱ्या कॉल्‍सना अचूकतेसह ब्‍लॉक करते. युजर फिशिंग लिंक्‍स व संदेशांवर क्लिक करण्‍यापूर्वी फसव्या लिंकला आता ओळखू शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >