'पिट्या भाई'ने कमळ घेतले हाती! अभिनेता रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: 'मुळशी पॅटर्न' चित्रपट फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशीने आता कमळ हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी पिट्या भाईने संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट करत 'मी माझ्या विचारांसोबत, राष्ट्रप्रथम' असे कॅप्शन लिहले होते. सोशल मीडीयावरील या अचानक केलेल्या पोस्टमुळे रमेश परदेशी हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र रमेश परदेशीने काल (१८ नोव्हेंबर) भाजपमध्ये प्रवेश केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितत रमेश परदेशी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.



विशेष म्हणजे रमेश परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पुण्यात भरलेल्या मनसे मेळाव्याला रमेश उपस्थित होता. या मेळाव्यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमेश परदेशीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील फोटो शेअर केल्यावरुन सुनावले होते. "छाती ठोकपणे सांगतो मी संघाचा कार्यकर्ता आहे, असे म्हणताय तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठेतरी राहा", अशा शब्दाच ठाकरेंनी रमेशला प्रश्न केला होता.



Comments
Add Comment

एनडीए बिहारमध्ये पास, दिल्ली आणि महाराष्ट्रात 'स्थानिक'च्या परीक्षेसाठी सज्ज

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. एनडीए बिहार

महायुतीत कुरबुरी ? एकनाथ शिंदेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई : राज्यात महायुतीत मिठाचा खडा पडतो की, काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फडणवीसांच्या बाणाने शिवसेना घायाळ!

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज झालेल्या कॅबिनेट

अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पूजा

बारामती : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'सहयोग सोसायटी' या निवासस्थानासमोर अघोरी पूजा आणि

नगरपरिषद निवडणुकीत ‘परिवारराज’; नेत्यांच्या बायका, मुली, वहिनींची रिंगणात एन्ट्री

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तळागाळातील कार्यकर्त्यांचे राजकीय स्वप्न पूर्ण होईल, अशी

आगामी निवडणूकांमध्ये कोकणात मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकणार ! 

मुंबई: राज्यात लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणूका महायुती आणि महाविकास आघाडीच्या या दोन मोठ्या आघाड्यांमध्ये