Wednesday, November 19, 2025

भारतात येताच गुंड अनमोल बिश्नोईला एनआयएने घेतले ताब्यात

भारतात येताच गुंड अनमोल बिश्नोईला एनआयएने घेतले ताब्यात

नवी दिल्ली : गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल याची अमेरिकेतून हकालपट्टी झाली. अमेरिकेतून भारतात येताच एनआयएने अनमोल बिश्नोईला विमानतळावरच ताब्यात घेतले.

अनमोल ज्या विमानातून येत होता ते विमान उतरण्याआधीच दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बंदोबस्त वाढवण्यात आला होता. विमान भारतीय जमिनीवर उतरताच एनआयच्या पथकाने तातडीने कारवाई केली. गुंड अनमोल बिश्नोईला एनआयएने ताब्यात घेतले. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन काही तासांतच अनमोलला पतियाळा कोर्टात हजर करणार आहेत.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्याच्या ताबा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी त्याला संबंधित तपास यंत्रणांकडे सोपविण्यात आले आहे.अनमोल बिश्नोई विविध गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये हवा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली आणि अखेर अमेरिकी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्याला भारतात परत आणण्यात यश आले.

सध्या तपास यंत्रणा त्याच्याकडून चौकशी करून संबंधित प्रकरणांमध्ये पुढील कारवाई करण्याची शक्यता आहे. एनआयए बऱ्याच काळापासून त्याच्या ठिकाणांवर आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पुढील टप्प्यात (NIA) न्यायालयात त्याच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता असून, चौकशीदरम्यान त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळू शकते, असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >