Wednesday, November 19, 2025

मुंबई महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागातील रिक्त पदे भरणार

मुंबई महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागातील रिक्त पदे भरणार

सुविधाकारांची ४८ रिक्तपदे खात्यांतर्गत लिपिकांमधून भरणार

ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस संस्थेची निवड

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यातील सुविधाकार पदाची ४८ रिक्तपदे भरण्यात येणार असून ही सर्व पदे कार्यकारी सहायक अर्थात लिपिक किंत तत्सम कर्मचाऱ्यांमधून खात्यांतंर्गत भरण्यात येणार आहे. यासाठी लवकरच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच यासाठी लिपिक पदांवरील कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

मुंबईतील विविध खात्यांमधील तसेच विभागांमधील क आणि ड संवर्गातील कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टीसीएस,आयबीपीएस या कंपनीच्रूा माध्यमातून ऑनलाईज अर्ज मागवून केली जात आहे.

दुकाने आणि आस्थापना खात्यातील निरिक्षकांची अनेक पदे रिक्त असून सुविधाकार संवर्गातीलही अनेक पदे रिक्त आहेत. त्या सुविधाकार संवर्गातील तब्बल ४८ पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवून वस्तूनिष्ठ ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आली. या ऑनलाईन परीक्षेसाठी सुमारे अर्ज प्राप्त होतील असा अंदाज आहे.

Comments
Add Comment