मोहित सोमण: आजपासून गॅलार्ड स्टील लिमिटेड (Gallard Steel Limited) व एक्सेलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Excelsoft technologies Limited) या दोन कंपन्यांचे आयपीओ बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे.एक्सेलसॉफ्ट कंपनीच्या आयपीओला पहिल्या दिवशी सकाळी ११.४१ वाजेपर्यंत एकूण ०.२४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ०.३५ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.२९ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. अद्याप पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अद्याप कुठलेही सबस्क्रिप्शन मिळालेले नाही. तर गॅलार्ड स्टील कंपनीला पहिल्या दिवशी ११.४१ वाजेपर्यंत १.५४ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण आयपीओतील १.२८ पटीने सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४.१७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. अद्याप पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून कुठलेही सबस्क्रिप्शन मिळाले नाही. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती...
१) Excelsoft Technologies Limited- आज कंपनीचा ५०० कोटींचा आयपीओ बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. आज १९ ते २१ जून कालावधीत हा आयपीओ बाजारात उपलब्ध असेल. २४ तारखेपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) होणार असून २६ नोव्हेंबरला कंपनीचा शेअर बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीने ११४ ते १२० रूपये प्राईज बँड निश्चित केला असून किरकोळ गुंतवणूकदारांनी किमान १५००० रूपये (१२५ शेअर) गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली आहे. १.५० कोटी शेअर्सचा म्हणजेच १८० कोटी मूल्यांकनाचा हा फ्रेश इशू असून उर्वरित २.६७ कोटी शेअर (३२० कोटी) हे ऑफर फॉर सेल (OFS) असणार आहेत. Anand Rathi Advisors Limited हे कंपनीचे बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार आहेत तर MUFG Intime India Private Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.
एकूण ४१६६६६६६ शेअर्सचा हा पब्लिक इशू असणार आहे. त्यातील १५०००००० शेअर हे फ्रेश इशू असून उर्वरित २६६६६६६६ शेअर हे ऑफर फॉर सेल असतील. पेंडांता टेक्नॉलॉजीज लिमिटेड, धनंजया सुधनवा, लाजवंती सुधनवा, श्रुती सुधनवा हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओतील एकूण ५०% भागभांडवल पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB), किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors), विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) १५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. माहितीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर २४% अधिक महसूल मिळाला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात १७२% वाढ झाली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या उत्पन्नात (Total Income) मार्च महिन्यातील २४८.८० कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ६०.२८ कोटीवर घसरण झाली आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) मार्च महिन्यातील ३४.६९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ६.०१ कोटींवर घसरण झाली आहे. ईबीटा (EBITDA) मध्येही तिमाही बेसिसवर ७३.२६ कोटींवरुन १०.१८ कोटीवर घसरण झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १३८१.०१ कोटी रुपये आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी भांडवली खर्चासाठी, इक्विपमेंट अपग्रेडेशन करण्यासाठी, आयटी इन्फ्रास्ट्रक्चरवर सु़धारणेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
कंपनी जागतिक स्तरावरील SaaS सोल्यूशन्स आणि सेवा प्रदान करते कंपनीने आर्थिक वर्ष २५ पर्यंत तिच्या टॉप लाईन्समध्ये वाढ नोंदवली असली तरी आर्थिक वर्ष २४ मध्ये कंपनीच्या नफ्यात मोठा धक्का बसला आहे.
हा आयपीओ सबस्क्राईब करावा का? तज्ञांनी काय म्हटले?
कंपनी अत्यंत स्पर्धात्मक आणि विखंडित क्षेत्रात कार्यरत आहे. तिच्या अलीकडील आर्थिक डेटानुसार, हा इश्यू आक्रमक किंमतीचा दिसतो. कंपनी अत्यंत स्पर्धात्मक आणि विखंडित विभागात कार्यरत आहे. तिच्या अलीकडील आर्थिक डेटानुसार, हा इश्यू आक्रमक किंमतीचा (Aggressively Price) दिसतो. केवळ सुज्ञ/रोख अधिशेष/जोखीम शोधणारेच दीर्घकालीन निधी मध्यम प्रमाणात ठेवू शकतात असे बाजार तज्ज्ञ दिलीप दावडा म्हणाले आहेत.
२) Gallard Steel Limited- कंपनीचा आयपीओ आज १९ ते २१ नोव्हेंबर कालावधीत बाजारात उपलब्ध असणार आहे. ३७.४० कोटी बूक व्हॅल्यु असलेला हा एसएमई आयपीओ बाजारात ०.२५ कोटींच्या फ्रेश इशूसह बाजारात दाखल होईल ज्यांचे मूल्यांकन ३७.५० कोटींच्या घरात असेल. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप २४ नोव्हेंबरपर्यंत होऊ शकते. तर बीएसई एसएमईवर हा शेअर २६ नोव्हेंबरपर्यंत सूचीबद्ध (Listed) होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १००० शेअर्सची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान ३ लाखांची गुंतवणूक करावी लागेल. १४२ ते १५० रूपये प्रति शेअर इतका प्राईज बँड आयपीओसाठी निश्चित करण्यात आला आहे. Seren Capital Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Ankit Consultancy Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहेत. मार्केट मेकर म्हणून Asnani Stock Broker Pvt Ltd म्हणून काम करेल. एकूण २५००००० शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतील. त्यातील ५% शेअर (१२५००० शेअर) मार्केट मेकरसाठी, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ११८३००० शेअर (४७.३२%), विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ३६०००० (१४.४०%), किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ८३२००० (३३.२८%) शेअर उपलब्ध असणार आहेत. झाकीउद्दीन सुजाउद्दीन, हकीमुद्दीन घंटावाला, कैद जोहर कलाभाई, जहाबिया कलाभाई आणि मारिया झकीउद्दीन सुजाउद्दीन हे प्रवर्तक आहेत. कंपनीने आयपीओपूर्व अँकर गुंतवणूकदारांकडून १०.६४ कोटी रूपये उभारले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २२०४-२५ मध्ये कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ९२% महसूल अधिक मिळाला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ९०% वाढ झाली आहे. कंपनीच्या उत्पन्नात तिमाही बेसिसवर मार्च तिमाहीतील ५३.५२ कोटींच्या तुलनेत जून तिमाहीत मात्र ३२.१४ कोटीवर घसरण झाली आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात तिमाही बेसिसवर मार्च तिमाहीतील ६.०७ कोटीतील तुलनेत जून तिमाहीत ४.२९ कोटींवर घसरण झाली आहे. ईबीटाही मार्च महिन्यातील १२.४७ कोटींच्या तुलनेत जून तिमाहीतील ७.४२ कोटीवर घसरले आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल १४२.५० कोटी रुपये आहे.
२०१५ मध्ये स्थापन झालेली गॅलार्ड स्टील लिमिटेड ही कंपनी इंजिनिअर स्टील कास्टिंग्जच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे. सौम्य स्टील, एसजीसीआय आणि लो अलॉय कास्टिंग्जचा या उत्पादनांचा यात समावेश आहे. कंपनी भारतीय रेल्वे, संरक्षण क्षेत्र, वीज निर्मिती आणि संबंधित उद्योगांसाठी वापरण्यास तयार घटक, असेंब्ली आणि सबअसेंब्लीज तयार करते, विविध क्षेत्रांमध्ये उत्पादन सोलूशन देते. वितळणे, उष्णता उपचार, ग्राइंडिंग, मोल्डिंग, वाळू मिसळणे आणि फिनिशिंग यासारख्या प्रक्रियांनसाठी आवश्यक असलेली सामग्री इन-हाऊस मशिनरी आणि उपकरणांचा वापर करते.
हा आयपीओ सबस्क्राईब करावा का? काय म्हणाले तज्ज्ञ?
कंपनी भारतीय रेल्वे, संरक्षण, वीज निर्मिती आणि संबंधित उद्योगांसाठी वापरण्यास तयार घटक, असेंब्ली आणि उप-असेंब्लींच्या निर्मितीमध्ये गुंतलेली आहे. अहवाल दिलेल्या कालावधीत त्यांनी त्यांच्या वरच्या आणि खालच्या पातळीवर वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२५ नंतर त्यांच्या समकक्षांच्या (Peers) तुलनेत वाढलेले उत्पन्न पाहून भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या अलीकडील आर्थिक डेटावर आधारित हा मुद्दा पूर्णपणे किमतीचा दिसतो.आयपीओ नंतरचा लहान इक्विटी बेस स्थलांतरासाठी दीर्घ गर्भावस्था कालावधी दर्शवितो. सुज्ञ/रोख अधिशेष (Cash Surplus) गुंतवणूकदार दीर्घकालीन कालावधीसाठी मध्यम निधी ठेवू शकतात.






