Wednesday, November 19, 2025

मुंबईतील १३ प्रभागांमध्ये समान आरक्षणाची हॅट्रीक, सलग तिसऱ्या निवडणुकीतही आरक्षण राहिले सारखेच

मुंबईतील १३ प्रभागांमध्ये समान आरक्षणाची हॅट्रीक,  सलग तिसऱ्या निवडणुकीतही आरक्षण राहिले सारखेच

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. या प्रभाग आरक्षणात अनेकांचे प्रभाग गेले असून काहींना दुसऱ्या प्रभागांमध्ये धाव घेण्याची वेळ आली. परंतु २२७ प्रभागांमधील १३ प्रभागांमधील सलग तिसऱ्या निवडणुकीतही कायम राहीले आहे.त्यामुळे प्रभाग आरक्षण कायम राहिल्याने १३ प्रभागांमध्ये आरक्षण समानच राखले गेल्याने तेथील माजी नगरसेवकांना पुन्हा तिथेच लढण्याची संधी कायम आहे.

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता मागील आठवड्यात प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग आरक्षण नव्याने पडल्याने अनेकांना चिठ्यावरच आलेल्या आरक्षणावर नशीब आजमावे लागले आहे. मात्र, हे आरक्षण चक्राकार पध्दतीने येईल, त्यामुळे सन २००७, सन २०१२, सन २०१७वर आधारीत काढले जाणार असल्याने प्रत्येकाने अनुमान लावून प्रभाग बांधणीला सुरुवात केली होती. परंतु नव्याने प्रभाग आरक्षण सोडत काढल्याने अनेकांचे प्रभाग आरक्षण बदलेले गेले किंवा मनासारखे आरक्षण न पडल्याने एकतर घरी बसावे लागले किंवा त्यांना दुसऱ्या प्रभागांत शोध घेण्याची वेळ आली आहे. परंतु यातील १४ प्रभागांमध्ये सन २०१२ पासून आजमितीपर्यंत समानच आरक्षण पडल्याचे दिसून येत आहे.

सलग तिन निवडणुकांमध्ये समान आरक्षण राहिलेल्या १३ प्रभागांमध्ये पाच भाजपाचे नगरसेवक आणि नगसेविका निवडून आलेले आहेत. तर उबाठाचे नगरसेवक निवडून आलेल्या ४ प्रभागांचा समावेश आहे, दोन प्रभाग शिवसेना, काँग्रेस एक आणि अभासे नगरसेवकांचा आहे.

या प्रभागांमध्ये सन २०१२, सन २०१७,  सन २०२४ मधील आरक्षण कंसात आहे

प्रभाग १४ : भाजपा -आसावरी पाटील(महिला, महिला, महिला)

प्रभाग १७ : भाजपा -बिना दोशी (महिला, महिला, महिला)

प्रभाग २९ : भाजपा- सागरसिंह ठाकूर (खुला, खुला, खुला)

प्रभाग ३२ : उबाठा -गीता भंडारी (ओबीसी महिला, ओबीसी महिला, ओबीसी महिला)

प्रभाग ३७ : भाजपा- प्रतिभा शिंदे (महिला, महिला, महिला)

प्रभाग ३९ : शिवसेना -विनया सावंत (महिला, महिला, महिला)

प्रभाग ६४ : उबाठा -शाहिदा हारुन खान (मृत)(महिला, महिला, महिला)

प्रभाग ८३ : काँग्रेस- विनिफ्रेड डिसोझा (महिला, महिला, महिला)

प्रभाग ९४ : उबाठा- प्रज्ञा भूतकर (महिला, महिला, महिला)

प्रभाग १५९ : उबाठा- कोमल जामसंडेकर (सर्वसाधारण, सर्वसाधारण, सर्वसाधारण)

प्रभाग १७४ : भाजपा- कृष्णावेणी रेड्डी (महिला, महिला, महिला)

प्रभाग २०१ : शिवसेना- सुप्रिया मोरे (महिला, महिला, महिला)

प्रभाग २१२ : अभासे- गीता गवळी (महिला, महिला, महिला)

मागील निवडणुकीप्रमाणे ५९ प्रभागांमध्ये समान आरक्षण

महापालिकेच्या सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता जाहीर झालेल्या आरक्षणानुसारच आगामी निवडणुकीकरता आरक्षण पडले आहे. यामध्ये २२७ प्रभागांपैंकी ५९ प्रभागांमध्ये मागील निवडणुकीप्रमाणेच आरक्षण पडले आहे. त्यामुळे ५९ प्रभागांमध्ये पुन्हा नगरसेवकांना लढण्याची संधी आहे. यामध्ये पुन्हा ओबीसी आरक्षण असलेल्या प्रभागांची संख्या ०५, महिला ओबीसी प्रभागांमची संख्या ०७, सर्वसाधारण महिला प्रभागांची संख्या २६, सर्वसाधारण प्रभागांची संख्या २० आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग प्रभागाची संख्या एक एवढी आहे. तर १६ ओबीसी प्रभाग या निवडणुकीत खुले झाले आहेत, तर ३० सर्वसाधारण म्हणजे खुले प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >