गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर असलेल्या कोलकातातील इडन गार्डन या खेळपट्टीवर टीम इंडियाची खेळी कमी पडली. मात्र आता भारतीय संघाला ही मालिका गमावायची नसेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा कसोटी सामना जिंकावाच लागणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा कसोटी सामना गुहावटीमध्ये होणार आहे.
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा आणि अंतिम सामना २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत होणार असून पहिल्या सामन्यापेक्षा काही मिनिटं आधी दुसर्या सामन्याला सुरुवात होणार आहे. कोलकातात पहिल्या कसोटी सामन्याला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात झाली होती. मात्र कोलकाताच्या तुलनेत गुवाहाटीत ३० मिनिटांआधी नाणेफेक आणि सामना सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंदाजे ९ वाजता सामना सुरु होणार आहे. तर त्याआधी ८ वाजून ३० मिनिटांनी टॉस होईल.
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज ...
भारतीय संघावर पहिल्या सामन्यातील पराभवामुळे जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे आता भारतीय संघ कसोटीचा दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेसोबत बरोबरीचा हिशोब करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या पराभवानंतर भारतीय संघ या सामन्यात कोणत्या रणनितीने मैदानात उतरते? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.






