मोहित सोमण: गेले ४ दिवस घसरणीला ब्रेक लागला असून आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने आज रिबाऊंड करत मोठ्या पातळीवर उडी घेतली आहे. आकडेवारीची अनिश्चितता, युएस फेडमधील वक्तव्ये, घसरलेली मागणी या कारणामुळे घसरलेले सोने पुन्हा उसळले आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात १२० रूपये, २२ कॅरेट प्रति ग्रॅम दरात ११० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९० रूपयांनी वाढ झाली. परिणामी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२४८६ रूपये, २२ कॅरेटसाठी ११४४५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९३६४ रुपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात १२०० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ११०० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ९०० रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२४८६० रूपये, २२ कॅरेटसाठी ११४४५० रूपये, १८ कॅरेटसाठी ९३६४० रुपयांवर पोहोचला आहे.
मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी आज १२४८६ रूपये, २२ कॅरेटसाठी ११६०० रूपये, १८ कॅरेटसाठी ९६८५ रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत १.१२% वाढ झाली असून दरपातळी १२४०१९ रूपयांवर गेली आहे. जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.२५% वाढ झाली असून जागतिक मानक (Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत १.२४% वाढ झाली आहे.
प्रामुख्याने डिसेंबर महिन्यात अपेक्षित फेडरल व्याजदरात कपात जवळ असल्याने, तसेच कमकुवत कामगार आकडेवारी व आगामी संभाव्य कमकुवत आकडेवारी यामुळे व्याजदरात कपात होईल आणि दिलासा मिळेल या आशेने सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. इतरही दिवसभरात विश्लेषकांच्या वक्तव्यांमुळेही आज बाजारात प्रभाव टाकला. सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांनी अचानक पुन्हा एकदा गुंतवणूक वाढवल्याने गोल्ड स्पॉट दरात मागणी वाढली आणि आशियाई बाजारातही या प्रभावासह जपानसह इतर देशांत भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ सुरू झाल्याने सकारात्मक जपली गेली आणि अंतिमतः सोन्यात वाढ झाली आहे.
चांदीतही वाढ कायम !
आज सलग दुसऱ्यांदा चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील चांदीच्या मागणीत वाढ, युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची शक्यता, मागणीत झालेली वाढ या कारणामुळे वाढ झाली आहे. खरं तर काल संध्याकाळी सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली होती. मात्र आज दुपारपर्यंत डॉलरमध्ये घसरण झाल्याने चांदीच्या वाढीला बळ मिळाले आहे.
कमकुवत लेबर आकडेवारीनंतर गव्हर्नर वॉलर यांनी पुन्हा एकदा २५ बेसिस पॉइंट्स दर कपात करण्याची गरज व्यक्त केली होती. कारण भरतीतील घसरण, मंदावलेली वेतन वाढ आणि कमकुवत ग्राहक भावना यांचा समावेश त्यांच्या वक्तव्यात होता. तज्ञांच्या मते, भारतातील लग्नाच्या हंगामात भौतिक मागणी वाढली आहे, तर संभाव्य अमेरिकन टॅरिफबद्दलच्या चिंतेमुळे जागतिक बाजारपेठेत अस्वस्थता वाढली आहे ज्यामुळे सोन्याच्या व चांदीच्या गुंतवणूकीत वाढ सुरू झाली आहे.
गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ६ रुपये व प्रति किलो दरात ६००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १६८ व प्रति किलो दर १६८००० रूपयांवर गेले आहेत. भारतीय सराफा बाजारात चांदीचे प्रति ग्रॅम सरासरी १० ग्रॅम दर आज १६२० रूपये व प्रति किलो दर १६८००० रुपयांवर गेले आहेत. जागतिक सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.७६% वाढ झाली आहे.






