नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते गृहखात्याशी संबंधित उत्तर विभागीय परिषदेच्या ३२ व्या बैठकीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे, असेही अमित शाह म्हणाले.
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाने 'घृणास्पद दहशतवादी हल्ला' म्हणून घोषित केले. तसेच स्फोटात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा केली जाईल अशीही घोषणा केली होती.
मुंबई: राज्यात लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणूका महायुती आणि महाविकास आघाडीच्या या दोन मोठ्या आघाड्यांमध्ये लढल्या गेल्या. यामुळे आगामी स्थानिक ...
दरम्यान, राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे. एनआयएने उमरचा आणखी एक सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला श्रीनगरमधून अटक केली आहे. हमाससारखे ड्रोन आणि छोटे रॉकेट बनवून भारतात मोठा हल्ला करण्यासाठी तो योजना आखत होता.






