चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’ यांसारखे अजरामर चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरु होत आहे.


१२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जानेवारी मध्ये मुंबई व ठाणे येथे होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा विशेष विभाग असणार आहे तसेच प्रभात चित्र मंडळ आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या संस्था डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचे विशेष शो आयोजित करणार आहेत.


तसेच या १२५व्या जयंती वर्षानिमित्त गोव्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम निर्मित ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी (१९४६)’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि महोत्सवाच्या सांगता समारंभात डॉ. व्ही. शांतारामांचे चित्र असलेल्या पोस्ट स्टॅम्पचे अनावरण करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला