मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या कलात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १६५.२९ अंकाने व निफ्टी ५८.०० अंकांने घसरला आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात होत असलेली घसरण नफा बुकिंगसाठी होत असून आगामी पीएमआय, व इतर आकडेवारीची गुंतवणूकदार वाट पाहत असल्याने आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली आहे. मात्र कालची पीएसयु बँक निर्देशांकातील तेजी कायम असल्याने काही प्रमाणात वाढलेल्या बँक निर्देशांकाने बाजारातील घसरण मर्यादित पातळीवर रोखली आहे. लार्जकॅपसह मिड व स्मॉल कॅप दोन्ही निर्देशांकात घसरण व बहुतांश निर्देशांकात घसरण झाली असल्याने बाजाराला आधारभूत पातळी राखता आली नाही. तर आज सर्वाधिक घसरण निफ्टी निर्देशांकात स्मॉलकॅप २५० (०.५८%), मायक्रोकॅप २५० (०.५३%), स्मॉलकॅप २५० (०.५८%) निर्देशांकात झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात केवळ पीएसयु बँक (०.३९%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.१२%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण रिअल्टी (०.९८%), आयटी (०.६३%), मेटल (०.८३%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.५७%) निर्देशांकात झाली आहे.
आज आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.२१%) सह निकेयी २२५ (२.८८%), हेंगसेंग (१.३९%), कोसपी (२.६२%) निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूणच आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात घसरणीकडे कल राहिला आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपपैकी एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स अशा बड्या शेअर्समध्ये आज घसरण झाली असून बीएसई, लरूस लॅब्स, अँक्सिस बँक या हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने काही प्रमाणात बाजारात दिलासा मिळाला आहे. काल युएस बाजारात अखेरीस डाऊ जोन्स (०.२१%), एस अँड पी ५०० (०.९२%), नासडाक (०.८६%) तिन्ही निर्देशांकात घसरण झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ सुंदरम फास्ट (५.१२%), अँस्टर डीएम हेल्थ (४.९२%), आरसीएफ (३.१६%), आयडीबीआय बँक (२.२४%), मॅक्स हेल्थकेअर (१.८०%), लीला पॅलेस हॉटेल (१.७४%), बिकाजी फूडस (१.७४%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण काईन्स टेक (४.७०%), वन सोर्स (४.०२%), एमक्यूअर फार्मा (३.८४%), हिंदुस्थान कॉपर (२.२२%), सुंदरम फायनान्स (२.२०%), नेटवेब टेक्नॉलॉजी (२.०५%), सेल (१.९१%), झेन टेक्नॉलॉजी (१.८९%), हिंदुस्थान झिंक (१.७४%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारपूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,' बाजारात सुरू असलेल्या तेजीला मदत करणारे तीन अनुकूल घटक आहेत. एक, व्हाईट हाऊसमधील अधिकृत सूत्रांनी असे सूचित केले आहे की 'अमेरिका भारतासोबत व्यापार कराराच्या जवळ आहे. दुसरे, कमी होत चाललेला एआय व्यापार भारताला फायदा देईल. तीन - वाढीतील लवचिकता आणि वाढत्या उत्पन्नात दिसून येणारी मूलभूत तत्त्वे सुधारत आहेत. हे तीन घटक भारतात सुरू असलेल्या सौम्य तेजीला अनुकूल आहेत. एफआयआय खरेदीदारांकडे वळत आहेत हे देखील सकारात्मक आहे; परंतु हे एक ट्रेंड आहे असे म्हणणे खूप लवकर आहे. जीएसटी कपातीमुळे वापरात वाढ झाल्याने बाजारात दिसून येणाऱ्या आशावादाचे समर्थन होते. परंतु जर बाजारातील तेजी टिकवायची असेल तर वापरातही तेजी टिकून राहिली पाहिजे. म्हणून, मागणी आणि वापराशी संबंधित प्रमुख निर्देशकांकडे लक्ष ठेवा.'
बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' २६१३० आणि २५८४० दोन्हीही स्थिर असल्याने, दिशात्मक गती मिळविण्यासाठी संघर्ष दिसून येतो. आपण दिवसाची सुरुवात बाजूच्या बाजूने करू, २५९८० किंवा २५९०० पातळीपर्यंत घसरण्याची अपेक्षा करू आणि त्यानंतर वरच्या दिशेने प्रयत्न करू. पर्यायी, २६०२२ पातळीवर थेट वाढ २६१३० साठी कॉल करू शकते.'






