Tuesday, November 18, 2025

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात 'सेल ऑफ' व है वैश्विक कारण जबाबदार! सेन्सेक्स ३४३.३२ अंकाने व निफ्टी १०३.४० अंकांने कोसळला

Stock Market Closing Bell: शेअर बाजारात 'सेल ऑफ' व है वैश्विक कारण जबाबदार! सेन्सेक्स ३४३.३२ अंकाने व निफ्टी १०३.४० अंकांने कोसळला

मोहित सोमण: अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ३४३.३२ अंकाने व निफ्टी १०३.४० अंकांने घसरला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८४६०७.६३ अंकांने व निफ्टी ५० हा २५९१०.०५ पातळीवर स्थिरावला आहे. आज जागतिक अस्थिरतेच्या फटका शेअर बाजारात बसल्याने व आगामी आकडेवारीची प्रतिक्षा गुंतवणूकदार करत असल्याने मोठ्या प्रमाणात 'सेल ऑफ' झाले आहे.c विशेषतः आज अखेरच्या सत्रात सकाळच्या सत्रातील वाढलेल्या बँक निर्देशांकात घसरण झाल्याने व एकूणच मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण कायम राहिल्याने बाजार 'लाल' रंगात बंद झाले आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १०५.५५ व बँक निफ्टीत ६३.४५ अंकांने घसरण झाली आहे. बाजारात आज सेल ऑफ झाल्याने मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय अस्थिरतेच्या काळात सावधगिरी बाळगल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसह व घरगुती गुंतवणूकदारांकडून मोठी गुंतवणूक आजच्या दिवशी झाल्याची शक्यता कमी आहे. एआय कंपनीच्या निकालातील अनिश्चितता व युएससह जागतिक स्तरावर आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाले तोच फटका भारतीय बाजारालाही कायम बसला आहे. याशिवाय रिअल्टी, मेटल, हेल्थकेअर या श्रेत्रीय समभागातही बाजारात नुकसान झाले. तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का यावरही अद्याप शाश्वती नसल्याचाही फटका बाजारात बसला.

निफ्टी व्यापक निर्देशांकात (Nifty Borader Indices) अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण मिड कॅप सिलेक्ट (०.५७%),मिडकॅप १०० (०.५९%), स्मॉलकॅप १०० (१.०५%), स्मॉलकॅप ५० (१.०४%), मायक्रोकॅप २५० (०.८१%) निर्देशांकात झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण मिड स्मॉल आयटी टेलिकॉम (१.१५%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.८३%) व, रिअल्टी (१.१९%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.७२%), मेटल (१.०७%) निर्देशांकात झाली आहे.

बीएसई (Bombay Stock Exchange BSE) व एनएसई (नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE) या दोन्ही शेअर बाजारात 'बियरिश' भावना कायम राहिल्याने रॅली होण्यास अपयश आले आहे. बीएसईत ४३४१ समभागांपैकी (Stocks) १४६७ समभागात वाढ झाली असून इतर २७९३ समभागात घसरण झाली आहे. एनएसईत ३२१४ समभागापैकी ९६९ समभागात वाढ झाली असून २१६८ समभागात घसरण झाली आहे. एकूणच कमोडिटी बाजारतही अस्थिरता आज कायम राहिली आहे.

अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टी (०.४२%)सह सगळ्याच निर्देशांकात घसरण झाली सर्वाधिक प्रमाणात निकेयी (३.०१%), स्ट्रेट टाईम्स (०.८६%), हेंगसेंग (१.८३%), तैवान वेटेड (२.५८%), सेट कंपोझिट (०.७९%), शांघाई कंपोझिट (०.८२%) निर्देशांकात झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ बॉम्बे बर्मा (९.७६%), जीएमआर एअरपोर्ट (६.१८%), सफायर फूडस (४.३४%), केपीआर मिल्स (३.२५%), एथर एनर्जी (३.०८%), किर्लोस्कर ऑईल (२.८६%) एम अँड एम फायनांशियल सर्विसेस (२.७७%), सुंदरम फायनान्स (२.४९%), भारती हेक्साकॉम (२.४८%), फेडरल बँक (२.८८%), अतुल (२.१५%), हुडको (२.००%) समभागात झाली आहे.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण टीआरआयएल (७.६३%), काईन्स टेक (५.५८%), एसकेएफ इंडिया (४.०१%) गोदावरी पॉवर (४.०२%),अलेबिंक फार्मा (३.७२%), होनसा कंज्यूमर आयनॉक्स वाईंड (४.६०%), जीएमडीसी (३.५४%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.५१%), सीएट (३.३४%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (३.३३%), सीसीएल प्रोडक्ट (३.१३%), कल्पतरू प्रोजेक्ट (३.०२%), कमिन्स इंडिया (२.९४%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अलीकडील तेजीनंतर गुंतवणूकदारांनी नफा बुक केल्याने देशांतर्गत शेअर बाजार घसरला, जो कमकुवत जागतिक भावना दर्शवितो. डिसेंबरमध्ये अमेरिकन फेडच्या दर कपातीची अपेक्षा कमी झाली आहे, ज्यामुळे भावनांवर परिणाम झाला आहे. मजबूत डॉलरमुळे आयटी, धातू आणि रिअल्टी शेअर्समध्ये घसरण झाली आहे, तर खाजगी बँकांनी काही आधार दिला आहे. गुंतवणूकदार आता या आठवड्यातील अमेरिकन नोकऱ्यांच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत, जे फेडच्या धोरणात्मक दृष्टिकोनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. पुढे जाऊन, भारत-अमेरिका व्यापार करारातील प्रगती आणि देशांतर्गत उत्पन्नाचा दृष्टिकोन मजबूत केल्याने आत्मविश्वास पुनर्संचयित होण्यास मदत होऊ शकते आणि बाजारातील गतीला २६००० पातळीच्या निफ्टी५० पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचण्यास मदत होऊ शकते.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण निफ्टी पोझिशनवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,'निफ्टी १५० अंकांच्या मर्यादेतच राहिला, जो सलग दुसऱ्या दिवशी एकत्रीकरणाचा दिवस होता. दैनिक चार्टवर मंदीचा एक गुंतवणुकीचा नमुना तयार झाला आहे, जो चालू किमतीतील वाढीला विराम देण्याचे संकेत देतो. ताशी आरएसआयने मंदीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केला आहे आणि निर्देशांकाने ताशी वेळेच्या फ्रेमवर खालचा टॉप तयार केला आहे, जो ट्रेंडच्या सुरुवातीला कमकुवतपणा दर्शवितो. खालच्या टोकावर, समर्थन (Support) २५८५० पातळीवर ठेवले आहे; या पातळीपेक्षा कमी झाल्यास २५७०० पातळीच्या दिशेने आणखी सुधारणा होऊ शकते. दुसरीकडे, २६०००-२६०५० पातळीवर प्रतिकार दिसून येतो, ज्याच्या वर ट्रेंड उलटू शकतो.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >