मोहित सोमण: स्पेस टेक टेक्नॉलॉजीत सातत्याने भारतात प्रगती होत आहे. मोठ्या प्रमाणात अंतराळ संशोधन अथवा तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतीय व विदेशी गुंतवणूक फर्मकडून झाल्याचे पहावयास मिळाले होते. आता नव्या माहितीनुसार, सिडबी (SIDBI) संस्थेची उपकंपनी (Subsidary) असलेल्या सिडबी वेचंर कॅपिटल लिमिटेडने (SVCL) कंपनीने अंतरीक्ष वेंचर कॅपिटल फंडात (AVSF)१००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. अंतराळ तंत्रज्ञानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून व विशेषतः रिसर्च व डेव्हलपमेंट (R&D) वरील गुंतवणूक करण्यासाठी ही गुंतवणूक केल्याचे समजते आहे. खासकरून स्पेसटेक स्टार्टअपला आवश्यक असलेले फंडिंग देऊन त्यांच्या सुरूवातीच्या काळात अर्थसाह्य करण्यासाठी ही योजना आखली गेली.
अंतरिक्ष वेंचर कॅपिटल फंड (AVCF) हा १० वर्षाच्या कालावधीसाठी निधी वाटप केले जाणार आहे. पर्यायी गुंतवणूक निधी (Alternative Investment Fund AIF) प्रकारातील सिरिज २ फंडिग हे करण्यात येईल असे कंपन्यांनी आपल्या संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे. हा निधी वाहने उत्पादन, सॅटेलाईट, पेलोड, इन स्पेस, ग्राउंड सर्विसेस, सार्वभौम फंड (Soverign Fund) यांसारख्या विविध प्रकारात पैसे गुंतवले जाणार आहेत असे सिडबी वेंचर कॅपिटलने म्हटले आहे.
एसव्हीसीएलचे प्रयत्न भारताच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी आणि एमएसएमईंना पाठिंबा देण्याच्या एसआयडीबीआयच्या ध्येयाशी सुसंगत आहेत. हा निधी भारताला त्याच्या स्पेस व्हिजन २०४७ च्या जवळ जाण्यास मदत करेल. यामुळे तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन मिळेल आणि अंतराळ क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढेल असे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
एसव्हीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अरुप कुमार म्हणाले आहेत की,' एसव्हीसीएलने १९९९ मध्ये नॅशनल व्हेंचर फंड फॉर सॉफ्ट वेअर अँड आयटी इंडस्ट्रीसह आपला प्रवास सुरू केला.गेल्या काही वर्षांत आमच्या निधीने बिल डेस्क आणि डेटा पॅटर्न सारख्या युनिकॉर्नसह अनेक कंपन्यांना पाठिंबा दिला आहे. अंतरिक्ष व्हेंचर कॅपिटल फंड भारतातील सर्वात मोठा स्पेसटेक-केंद्रित फंड आणि जागतिक स्तरावर सर्वात मोठा भारताची अवकाश क्षमता आणि स्पर्धात्मकता मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावेल.'






