मोहित सोमण:फिजिक्सवालाचा शेअर आज जबरदस्त प्रिमियम दरासह बाजारात सूचीबद्ध झाला आहे. कंपनीचा शेअर ३३% प्रिमियम दरासह सूचीबद्ध (Listed) झाला आहे. कंपनीच्या आयपीओची मूळ प्राईज बँड १०३ ते १०९ (Upper Band) रूपये प्रति शेअर होती. मात्र आज बीएसई व एनएसईवर शेअर ३३% प्रिमियम दर म्हणजेच १४५ रूपये प्रति शेअर दरासह सूचीबद्ध झाला आहे. ३४८१ कोटींच्या आयपीओचे बाजारात दणक्यात पदार्पण झाले आहे. ३१००.७१ कोटींचे शेअर हे फ्रेश इशू असून आयपीओतील उर्वरित ३.४९ कोटी शेअर (३८० कोटी) शेअर ओएमएस (Offer for Sale OFS) साठी उपलब्ध आहेत. आयपीओपूर्वीच कंपनीने १५६३ कोटी रूपयांची गुंतवणूक अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केली होती.
प्रवर्तक (Promoter) अलख पांडे यांच्या कंपनी फिजिक्सवाला कंपनीला एकूण १.९२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. त्यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांना १.१४ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना २.८६ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ०.५१ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. आयपीओपूर्वी कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात ७८% वाढ झाली असून कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ५१% वाढ झाली होती. तर कंपनीच्या एकूण उत्पन्नात तिमाही बेसिसवर ४१५६.३८ कोटींवरून ९०५.४१ कोटींवर घसरण झाली आहे.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी बाजार भांडवलासाठी (Capital Expenditure),लीज पेमेंटसाठी,उपकंपनीत गुंतवणूकीसाठी, आयटी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्यासाठी,मार्केटिंगसाठी,नव्या अधिग्रहणासाठी, इतर फंडीग व खर्चासाठी करण्यात येणार आहे.
फिजिक्सवाला ही ऑनलाईन क्लास घेणारी कंपनी आहे. या एडटेक कंपनीतजेईई, एनईईटी, यूपीएससी इत्यादी विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी चाचणी तयारी अभ्यासक्रम आणि डेटा सायन्स आणि अँनालिटिक्स, बँकिंग आणि फायनान्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इत्यादी अपस्किलिंग अभ्यासक्रमाचे क्लासेस घेण्यात येतात. सोशल मीडिया चॅनेल, वेबसाइट आणि अँप्सद्वारे ऑनलाइन सेवा देते तसेच कंपनीचे तंत्रज्ञान प्रणित ऑफलाइन केंद्रे आणि हायब्रिड केंद्रे देखील आहेत.