नवी दिल्ली : फोर्ब्स ही कायम अब्जाधीशांची यादी जाहीर करतात. या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीबद्दल सांगण्यात येतं. पण आता फोर्ब्सच्या या यादीत ९९ व्या क्रमांकावर ९१ वर्षीय बजरंगलाल टपारिया यांनी स्थान मिळवले आहे. बजरंगलाल टपारिया हे भारताचे 'प्लास्टिक किंग' म्हणून ओळखले जातात. ८४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या त्यांच्या कंपनीमुळे त्यांना भारतातील १०० श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळालंय. भारतातील सर्वात मोठ्या प्लास्टिक उत्पादन कंपन्यांपैकी एक असलेल्या सुप्रीम इंडस्ट्रीजचे संस्थापक बजरंग टपारिया यांनी वयाला आव्हान दिलं आहे.
राजस्थानातील जसवंतगड या गावातील रहिवासी बीएल तपारिया यांनी एक छोटासा कारखाना स्थापन केला. त्यानंतर हळूहळू त्याचा विस्तार करत करत त्यांनी या कंपनीला नवीन उंचीवर नेऊन पोहोचवलं आहे. राजस्थानाचे असले तरी सध्या मुंबईचे रहिवासी बीएल टपारिया यांची एकूण संपत्ती $३.२२ अब्ज किंवा ₹२,८५,६१,५६,१०,००० आहे. त्यांची कंपनी, सुप्रीम इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप अंदाजे $४७१.२४ अब्ज आहे. त्यांची कंपनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आली आहे.






