मोहित सोमण: ग्रो शेअरने आज रेकोर्डवर रेकॉर्ड केले आहेत.आज बिलियनब्रेन्स गॅरेज वेचंर लिमिटेड (ग्रो) कंपनीचा शेअर ८% पातळीवर उसळला असल्याने मूळ किंमतीपेक्षा शेअर ४०% उच्च उसळला आहे. त्यामुळे कंपनीने आपले बाजार भांडवल ६१५५ कोटीवरून वाढत ११३६८.६१ कोटींवर पोहोचवले आहे. कालच कंपनीचा शेअर २०% वाढत अप्पर सर्किटवर (उच्चांकावर) पोहोचला होता. आजही ६ ते ८% पातळीवर उसळल्याने शेअरने नवीन रेकोर्ड प्रस्थापित केला आहे. १२ नोव्हेंबरला कंपनीचा शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला होता. त्यामुळे एकूणच मूळ प्राईज बँडपेक्षा ९४% प्रिमियमसह शेअरने १९३.९१ आकडाही पार केला आहे. अंतिमतः कंपनी सर्वाधिक बाजार भांडवल असलेल्या १०० कंपनीच्या यादीत स्थान मिळण्यात यशस्वी ठरली आहे.
६६३२ कोटींचा आयपीओ ४ ते ७ नोव्हेंबर कालावधीत बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १५००० रूपयांची गुंतवणूक करणे अनिवार्य करण्यात आले होते. सकाळी ११.१२ वाजता ६.४४% उसळला असून १८५.६९ रूपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीच्या आयपीओला एकूण १७.६० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. किरकोळ गुंतवणूकदारांकडून ९.४३ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २२.०२ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून १४.२० पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर क्लाऊड तंत्रज्ञान प्रणालीतील खर्चासाठी, मार्केटिंग खर्चासाठी, व्यवसायिक वृद्धिंगत करण्यासाठी, उपकंपनीत गुंतवणूकीसाठी केला जाणार आहे.
ग्रो ही एक फिनटेक कंपनी आहे जी किरकोळ गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड, स्टॉक, ईटीएफ, आयपीओ, एफ अँड ओ, डिजिटल गोल्ड आणि यूएस स्टॉकसह विविध श्रेणीतील सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करण्यासाठी डी२सी (डायरेक्ट-टू-ग्राहक) या फिनटेक सेवा, डिजिटल गुंतवणूक प्लॅटफॉर्म व तत्सम सेवा गुंतवणूकदारांना ऑफर करते. तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी हा शेअर घेण्याचा किंवा यापूर्वीही आयपीओ लाँच दरम्यान दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी सबस्क्राईब कलणयाचक सल्ला दिला होता.






