ओडिशा : मागील काही दिवसापासून बॉलीवूड मधील कलाकारांच्या आजारपणाची नाहीतर मृत्यूच्या बातम्या समोर येत आहेत. झुबीन गर्ग या गायकाचा मृत्यूला काही महिने होत नाही तोच आणखीन एका गायकाचे निधन झाले आहे.
हुमाने सागर असं गायकाचं नाव असून तो प्रसिद्ध ओडिया गायक आहे. ओडियामध्ये हुमाने सागराची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. हुमानेच १७ नोव्हेंबरला सायंकाळी वयाच्या अवघ्या ३४ वर्षी निधन झालं. निधनाची बातमी ऐकताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, हुमानचे निधन अनेक अवयव निकामी झाल्यामुळे (मल्टी ऑर्गन डिसफंक्शन) झालं आहे. गेली अनेक दिवस त्याची तब्बेत ठीक नव्हती. त्याच्यावर तीन दिवस AIMS रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याला तात्काळ ICU यामध्ये शिफ्ट करण्यात आलं. काही टेस्टनंतर कळलं की त्याच्या शरीरातील महत्वाच्या अवयवांनी काम करणं बंद केलं आहे. एक्यूट- ऑन- क्रोनिक लिव्हर फेल्युअर, बाईलेटरल न्यूमोनिया, डायलेटेड कार्डियोमायोपॅथी यांसारखे गंभीर आजार त्याला झाले होते. त्याची तब्बेत दिवसेंदिवस खालावत चालली होती. अखेर सोमवारी संध्याकाळी त्याने प्राण सोडले.
मिळालेल्या माहितीनुसार, हुमानेची आई शेफाली यांनी त्याच्या मॅनेजर आणि इव्हेन्ट ऑर्गनायझर गंभीर आरोप लावले आहेत. त्याही तब्ब्येत ठीक नसतानाही त्याला स्टेज परफॉर्मन्ससाठी जबरदस्ती केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.






