'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' (Uri: The Surgical Strike) या सुपरहिट चित्रपटातून देशभर 'द सर्जिकल स्ट्राइक' फेम मिळवलेले दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या आगामी 'धुरंधर' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच, प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जवळपास ४.०७ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन आणि प्रत्येक कलाकाराचा 'खतरनाक' अवतार पाहायला मिळतोय. हा थरार अनुभवताना अक्षरशः अंगावर काटा येतो. आदित्य धर यांनी या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन आणि तगडी स्टारकास्ट यांचे समीकरण उत्तम जुळवण्यात यश मिळवले आहे, हे ट्रेलर पाहून स्पष्ट होते. आदित्य धर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवाद या ज्वलंत विषयांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे आणि त्यात मल्टीस्टार (Multi-Star) कलाकारांचा तडकासुद्धा आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक सिनेरसिकांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
?si=VlOHeF8m486-cP1d
चित्रपटात भारताच्या सुरक्षेचा थरार
दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' चित्रपटाचा जवळपास चार मिनिटांचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यामध्ये प्रेक्षकांना अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि रणवीर सिंह यांच्यासारख्या तगड्या कलाकारांच्या भूमिकांची झलक पाहायला मिळते. ट्रेलरवरून प्रत्येक भूमिकेला पडद्यावर चांगला स्क्रीनटाइम मिळाला असेल, हे स्पष्ट होते. या चित्रपटात अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्या खलनायकी भूमिका अत्यंत क्रूर आणि भयानक असल्याचे दिसून येते. खलनायक माणसांना जणू बाहुल्याच समजतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतानाचे सीन्स (Scenes) पाहून अक्षरशः अंगावर काटा येतो. ट्रेलरच्या सुरुवातीलाच हा चित्रपट वास्तविक कथेवर आधारित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जुन रामपाल हा एका अत्यंत हिंसक पद्धतीने ओळख करून दिलेल्या मेजर इक्बाल नावाच्या आयएसआय एजंटच्या (ISI Agent) भूमिकेत आहे. आर. माधवन यांनी अजय सन्यालची भूमिका साकारली आहे, जी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेपासून प्रेरित आहे. अक्षय खन्ना हा रहमान डकाईच्या भूमिकेत आहे. तर, संजय दत्त हे एसपी चौधरी अस्लमच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गुप्त सुरक्षा युद्धाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) महत्त्वाची बैठक पार पडली. या ...
दहशतवादी संघटनेत इफ्तिखार बनून काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा थरारक प्रवास
हा चित्रपट एका वास्तविक आणि अत्यंत धाडसी कथेवर आधारित असल्याची चर्चा आहे. 'धुरंधर' हा चित्रपट मेजर मोहित शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मेजर शर्मा यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीला हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत 'इफ्तिखार' बनून अंडरकव्हर एजंटचं (Undercover Agent) काम केलं होतं. त्यांच्या या शौर्यगाथेवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे. 'उरी' च्या प्रचंड यशानंतर तब्बल सहा वर्षांनी दिग्दर्शक आदित्य धर यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. थरारक अॅक्शन आणि देशप्रेम या त्यांच्या खास शैलीमुळे 'धुरंधर' कडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या ५ डिसेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






