मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ‘सीएनजी’ संकट!

रिक्षा-टॅक्सींच्या लांबच लांब रांगा


मुंबई : मुंबई आणि ठाण्यात अचानक सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंपांवर पुरवठा थांबला. ज्यामुळे चालकांची गैरसोय झाली. खराब झालेल्या पाइपलाइनमुळे वडाळा इथल्या एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) इथे बराच काळ गॅस पुरवठा विस्कळीत झाला. मुंबईतील बसेस, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी ही अनेक सार्वजनिक वाहने एमजीएलद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सीएनजीवर अवलंबून असतात. त्यामुळे सीएनजीचा पुरवठ्यातील खंडामुळे या वाहनांच्या सेवांवर गंभीर परिणाम झाला. प्रवाशांसोबतच वाहनचालकांचीही प्रचंड गैरसोय झाली.


मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतील अनेक पंप, विशेषत: सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना इंधन पुरवठा करणारे पंपदेखील बंद पडले. सीएनजी पेट्रोलपंप परिसरातील रस्त्यावर सीएनजी रिक्षांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. गॅसच नसल्याने अनेक रिक्षाचालकांना सोमवारी आपल्या व्यवसायावर पाणी सोडावे लागले असून रिक्षा घेऊन रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली.


मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांनो आजही सीनजीसाठी पंपावर जाऊ नका


हे संकट मंगळवारपर्यंत कायम राहणार आहे. १८ नोव्हेंबर दुपारी २ वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. सध्या महानगर लिमिटेडच्या एकूण ३८९ सीएनजी स्टेशन्सपैकी २२५ स्टेशन्स चालू आहेत. मंगळवारी दुपारनंतर पुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.


अन्यथा स्कूल बस रस्त्यावर उतरणार नाहीत
गेल इंडियाच्या मुख्य गॅस पाइपलाइनला वडाळा परिसरातील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपाऊंडमध्ये नुकसान झाल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे महानगर गॅस लिमिटेडच्या सिटी गेट स्टेशनला होणारा गॅस पुरवठा खंडित झाला आहे, ज्याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी स्टेशनवर झाला आहे. सीएनजी टंचाईमुळे प्रवाशांना, विशेषतः विमानतळावर जाणाऱ्या लोकांना, गोंधळाचा सामना करावा लागला आहे आणि यामुळे वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बस, रिक्षा, टॅक्सी, ओला-उबरवरही त्याचा परिणाम झाला आहे. मंगळवारी सकाळपर्यंत ही सेवा पूर्ववत होऊ शकली नाही, तर स्कूल बस रस्त्यावर उतरवणे कठीण होईल. मुंबईकरांच्या दैनंदिन व्यवहारावर ह्या सीएनजी तुटवड्यामुळे मोठा फटका बसला आहे.

Comments
Add Comment

Nashik : वणी येथे मंडप काढताना विजेचा धक्का लागून मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

दिंडोरी : वणी येथे लग्नाचा मंडप काढण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

Nashik : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाची 'तारीख पे तारीख'; मंत्री भुजबळांच्या शिफारस पत्राला महावितरणकडून केराची टोपली

Nashik : लोकप्रतिनिधींच्या पत्रालाही किंमत नाही आणि सामान्य जनतेच्या हक्काचीही दखल घेतली जात नाही, असा संतापजनक

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून

Kolhapur : कोल्हापुरात नवीन उद्योगांना बळ

 ४७.६३ हेक्टर शासकीय गायरान जमीन एमआयडीसीला; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ

Pandarpur Mandir : पंढरपूर मंदिरातील लेपन प्रक्रियेवरील स्थगिती अर्ज न्यायालयाने नाकारला

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणाऱ्या लेपन

Monsoon Delay : जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

अलिबाग : जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील