सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले नगर परिषद तर कणकवली नगरपंचायतीची निवडणूक रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सर्वच इच्छुकांची धावपळ उडाली होती. वेंगुर्ले नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ३, तर नगरसेवक पदासाठी २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवसापर्यंत थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ तर २०, नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सावंतवाडी नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाकरिता ११ आणि नगरसेवक पदाकरिता ११४ असे मिळून एकूण १२५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मालवण नगर परिषदेतील नगराध्यक्षपदासाठी ६, तर नगरसेवक पदासाठी ७६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ६ तर १७ नगरसेवक पदासाठी एकूण ५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.






