बेरोजगारीत कुठलाही बदल नाही - सरकारी सर्वेक्षण
मोहित सोमण: नुकत्याच नव्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट (LFPR) चार महिन्यात वाढतच राहिला असून ऑक्टोबर महिन्यात ५५.४% पातळीवर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर ५४.२% होता तत्पूर्वी ऑगस्ट महिन्यात हा दर ५५.०% व जुलै महिन्यात ५४.९% व जून महिन्यात ५४.२% होता. वय वर्षे १५ किंवा त्याहून अधिक वयाचे कामगारांच्या प्रतिनिधित्व असलेल्या मनुष्यबळाचा सर्वेक्षण वेळोवेळी करण्यात येते. सांख्यिकी व अंमलबजावणी मंत्रालय व नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने हा पीएलएफएस (Periodic Labour Force Survey PLFS) करण्यात येतो. तर महिला कामगारांच्या बाबत प्रतिनिधित्व पाहिल्यास अहवालातील माहितीनुसार, मे महिन्यानंतर प्रथमच ऑक्टोबर महिन्यात प्रतिनिधित्व (Participation) ३४.२% पातळीवर वाढले आहे.
अहवालातील माहितीनुसार, एकूणच वर्कर पॉप्युलेशन रेशो (WPR) हा जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाढतच आहे. ऑक्टोबर महिन्यात हा आकडा ५२.५% पोहोचला आहे.बेरोजगारीची आकडेवारीही अहवालाने जाहीर केली. या आकडेवारीत म्हटले आहे की ऑक्टोबर महिन्यात बेरोजगारी दरात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. त्यामुळे हा दर ऑक्टोबर महिन्यात ५.२% पातळीवर कायम राहिला आहे. तर महिला कामगारांच्या बाबत हा बेरोजगारी दर सप्टेंबर महिन्यातील ५.५% तुलनेत ऑक्टोबर महिन्यात ५.४% पातळीवर घसरण झाली आहे.
ऑक्टोबरमध्ये एकूण पॉप्युलेशन रेशो (WPR) लोकसंख्येमध्ये नोकरदार व्यक्तींचा वाटा हा ५२.४% वरून ५२.५% पर्यंत वाढला आहे. प्रामुख्याने मुख्यतः ग्रामीण भागात महिला कामगारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.






