मोहित सोमण:आज टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचा शेअर मोठ्या अंकांनी कोसळला. बाजाराच्या सुरूवातीलाच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचा (TMPV) शेअर थेट ७.२७% कोसळला आहे. कंपनीच्या कमकुवत तिमाही निकालासह कमजोर पद्धतीने झालेली सूचीबद्धता (Listing), टाटाची फ्लॅगशिप मोटर कंपनी 'जग्वार' कंपनीचा कमकुवत तिमाही निकाल व यापूर्वी झालेल्या कंपनीच्या आयटी सिस्टीमवर झालेला सायबर हल्ला या विविध कारणांमुळे आज कंपनीच्या शेअरला घसरत्या किंमतीचा सामना करावा लागला. दुपारी १२.३९ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ४.३७% घसरण होत ३७४.५० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत असल्याने शेअर रिकव्हर होत असला तरी गुंतवणूकदारांना पहिल्या सत्रात फटका बसला आहे.
यापूर्वी जेएलआर (Jaguar) कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ईबीटा १३०० कोटीने घसरला आहे. तर कंपनीच्या महसूलात १४% इतके प्रचंड नुकसान होत ते ७२३५० कोटींवर घसरले होते. नुवामा ब्रोकिंग संस्थेने कंपनीच्या भाकीतात आगामी काळात ईबीटा (EBITDA) आणखी ५ ते ८% घसरू शकते असे म्हटले आहे. ब्रोकरेजने दिलेल्या नकारात्मक कौलानंतर शेअरमधील सेल ऑफ मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. दरम्यान ते हळूहळू रिकव्हर होत असल्याचे आज बाजारात पाहायला मिळत आहे. तिमाहीत कंपनीला ५०० मिलियन डॉलरचे या तिमाहीत सायबर हल्ल्यात झाले होते. याचा फटका युकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात बसला होता. कंपनीच्या प्रगतीवर याचा नकारात्मक परिणाम झाला असून कंपनीच्या उत्पादनात २८.६% घसरण झाली होती.
या मुद्यावर प्रसारमाध्यमांशी भाष्य करताना फायनान्शियल ऑफिसर पीबी बालाजी यांनी व्यवसायासाठी हा एक कठीण काळ होता. तथापि, सायबर घटनेतून आणखी मजबूत बाहेर पडण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. विलय पूर्ण झाल्यामुळे, जेएलआर आणि देशांतर्गत पीव्ही व्यवसाय दोन्ही या आगामी उद्योगाद्वारे भविष्यातील महत्त्वपूर्ण संधींचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहेत' असे ते म्हणाले. बालाजी पुढे म्हणाले की जागतिक मागणी कमी झाली असली तरी, देशांतर्गत बाजारपेठेत सुधारणा होण्याची सुरुवातीची चिन्हे दिसून आली आहेत.






