मोहित सोमण:प्री ओपन सत्रात शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स १३५.७४ अंकाने व निफ्टी ३९.३५ अंकाने उसळला आहे. त्यामुळे आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ अपेक्षित आहेत. मात्र अमेरिकेतील 'करेक्टिव' उपायांमुळे बाजारात तेजी असली तरी चीन जपान यांच्यातील नव्या संघर्षाचा फटका आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात दिसत आहे. त्यामुळे या बाजारात संमिश्र कल कायम आहे. गिफ्ट निफ्टीतील वाढ नोंदविण्यात आल्यानंतर शेअर बाजारात मजबूत फंडामेंटलमुळे वाढ अपेक्षित आहे मात्र आजच्या तिमाही निकालासह भारतातील आगामी एसबीआय पीएमआय निर्देशांक, व रोजगार आकडेवारी तसेच इतर काही आकडेवारींची प्रतिक्षा गुंतवणूकदार करणार आहेत. त्यामुळे बाजारातील हे नवे 'ट्रिगर' बाजारात नवे वळण देतील. विशेष उल्लेख म्हणजे सकाळच्या सत्रात प्री ओपन सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांक १०७०.९४ अंकाने कोसळला आहे. इतकी मोठी घसरण संमिश्र तिमाही निकाल व आगामी आकडेवारी यानुसार रेपो दरात प्रस्तावित बदल होऊ शकतात. त्यामुळे मजबूत फंडामेंटल असूनही अस्थिरतेच्या जोरावर या निर्देशांकात घसरण कायम राहिली आहे. मात्र बँक निफ्टीत मात्र १७८.७५ अंकांची वाढ नोंदवली गेली आहे.
याखेरीज निफ्टी व्यापक निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मिडकॅप सिलेक्ट (०.४५%), मिडकॅप ५० (०.४३%), मायक्रोकॅप (०.३४%) झाली आहे. चांगली बाब म्हणजे सकाळच्या कलात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) १.८४% घसरला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.३८%), रिअल्टी (०.४९%), पीएसयु बँक (०.४५%), कंज्यूमर ड्युरेबल्स (०.३८%) निर्देशांकात वाढ झाली आहे.
सकाळच्या सत्रात आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात गिफ्ट निफ्टी (०.१७%), तैवान वेटेड (०.६२%), जकार्ता कंपोझिट (०.६७%), कोसपी (१.३९%) निर्देशांकात घसरण झाली असून वाढ निकेयी (०.४१%), शांघाई कंपोझिट (०.४३%), हेंगसेंग (०.८३%), स्ट्रेट टाईम्स (०.१८%), सेट कंपोझिट (०.१०%) निर्देशांकात झाली आहे. काल अखेरच्या सत्रात युएस बाजारातील डाऊ जोन्स (०.०८%), नासडाक (०.०६%) निर्देशांकात वाढ झाली असून एस अँड पी ५०० (०.०५%) निर्देशांकात घसरण झाली आहे.
आज शेअर बाजारातील सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ नुवोको विस्टा (१०.९७%), टीआरआयएल (९.९९%), आयनॉक्स वाईंड (९.९९%), आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर (४.७५%), ज्युब्लिअंट फार्मा (४.२४%), झायडस लाईफसायन्स (३.६६%), आरसीएफ (३.१५%), साई लाईफ (३.१५%) निर्देशांकात झाली आहे.
आज शेअर बाजारातील सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण एबी लाईफस्टाईल (३.३२%), एक्साईड इंडस्ट्रीज (२.८९%), गो डिजिट जनरल (२.५८%), सारडा एनर्जी (२.४३%), अदानी एंटरप्राईजेस (२.२६%), क्रिष्णा इन्स्टिट्यूट (२.२६%), बँक ऑफ महाराष्ट्र (१.४८%), एसबीएफसी फायनान्स (१.१९%) या निर्देशांकात घसरण झाली आहे.






