मोहित सोमण: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर लिमिटेड (आरसीएफने RCF) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. पीएसयु कंपनी एसआरएफला या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर १४०.६१ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १०६.३६ कोटींच्या तुलनेत यंदा ३३.४% वाढ झाल्याने हा १४०.६१ कोटींचा एकत्रित निव्वळ नफा (Consolidated Net Profit) मिळाला आहे. कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ४२८९.५६ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ५२९२.५८ कोटीने वाढ झाली असल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने स्पष्ट केले. तिमाहीतील निकालानुसार, एकत्रित उत्पन्न (Consolidated Income) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ७४.४५ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ११४.०९ कोटींवर पोहोचले आहे.
तिमाही निकालानुसार, कंपनीच्या एकत्रित करोत्तर नफ्यात (Consolidated Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ७८.६० कोटींच्या तुलनेत यंदा १०५.६९ कोटींवर वाढ झाली आहे. ईपीएस (Earning per share EPS) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेतील १.४३ रूपये तुलनेत यंदा १.९१ रूपयावर वाढ झाली आहे. कंपनीच्या ठेवीत (Reserves) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४०७०.८१ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४३७०.१७ कोटींवर वाढ झाली आहे. तर कंपनीच्या एकत्रित करपूर्व नफ्यात (Consolidated Net Profit Before Tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १०६ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १४०.९५ कोटींवर वाढ नोंदवली आहे.
सेगमेंटनुसार विचार केल्यास खतांच्या (Fertilizers) महसूलात महिना बेसिसवर (Month on Month MoM) गेल्या तिमाहीतीवल २१४३.९७ कोटीवरून या तिमाहीत २९४६.९७ कोटींवर वाढ नोंदवली. इंडस्ट्रियल केमिकल्स महसूलात मात्र तिमाही बेसिसवर गेल्या तिमाहीतील ३८२.७५ कोटीवरून या तिमाहीत ३२८.४९ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीच्या नफा मार्जिनमध्येही इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १.८३% वरून या तिमाहीत २% वाढ नोंदवली आहे. तर कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३.१३% तुलनेत या तिमाहीत ४.८१% वाढ नोंदवली आहे.
भारत सरकारने फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडची पुनर्रचना केल्यामुळे कंपनी १९७८ मध्ये अस्तित्वात आली. भारत सरकारने फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडची पुनर्रचना केल्यामुळे १९७८ मध्ये कंपनी अस्तित्वात आली. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी खते आणि औद्योगिक रसायनांचे उत्पादन आणि विपणन (Marketing) करते. कंपनीचे ७५% इक्विटी भागभांडवल (Stake) भारत सरकारकडे आहे. कंपनी ट्रॉम्बे आणि थाल येथे दोन मुख्य युनिट चालवते, युरिया आणि कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्ससह विस्तृत उत्पादनांचे उत्पादन करते आणि ऑगस्ट २०२३ पर्यंत 'नवरत्न' दर्जा कंपनीला मिळाला असून कॉर्पोरेट कार्यालय मुंबईत आहे.






