मोहित सोमण: पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड (Poonawala Fincorp Limited) एनबीएफसी कंपनीला आयकर विभागाकडून १६३९७५० लाख रूपये दंड भरण्यासाठी नोटिस बजावण्यात आली आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये संबंधित माहिती दिली आहे. लिस्टिंग ऑबलिगेशन अँड डिस्क्लोजर रिकवायरमेंट रेग्युलेशन २०१५ कायद्यातील तरतुदीनुसार ही नोटीस आयकर विभागाने कंपनीला बजावली आहे. याबद्दल माहिती देताना कंपनीने नेमक्या शब्दात म्हटले आहे की,'शीर्ष दिलेल्या विषयाच्या संदर्भात, आम्ही हे कळवू इच्छितो की हे प्रकरण कंपनीच्या अधिग्रहणापूर्वीच्या आर्थिक वर्ष २०१८-१९ कालावधीशी संबंधित आहे. आम्हाला १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयकर आयुक्त (अपील) कडून प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम २७०अ अंतर्गत १६३९५७० रुपये दंड आकारण्याचा आदेश मिळाला आहे. आदेशाची प्रत परिशिष्ट १ मध्ये येथे जोडली आहे.
आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की कंपनीने नेहमीच प्रशासन आणि नियामक आणि वैधानिक बाबींचे पालन करण्यासाठी उच्च मानके राखली आहेत. आम्ही या मानकांचे (Standards) पालन करण्यास वचनबद्ध आहोत.'
आर्थिक वर्ष २०२१ मध्ये रायजिंग सन होल्डिंग्स यांनी मॅगमा फिनकॉर्पचे अधिग्रहण केले होते. त्यानंतर या कंपनीचे नव्याने नाव पुनावाला फिनकॉर्प ठेवण्यात आले होते. रायजिंग सन होल्डिंग्स ही उद्योगपती अदर पुनावाला यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यांनी मॅगमा कंपनीतील ६०% भागभांडवल (Stake) खरेदी करून या कंपनीचे नियंत्रण मिळवले होते. या अधिग्रहणापूर्वी आर्थिक वर्ष २०१८-१९ साली आयकर कायदा १९६१ मधील कलम २५० अनुसार एकूण कर रकमेच्या ५०% रक्कम दंड (१६३९५७० लाख) आयकर विभाग आयुक्तांनी कायम ठेवला असल्याचे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये नमूद केले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर म्हणजेच काल कंपनीला ही नोटीस ईमेलद्वारे मिळाली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या सुधारित कर विवरणपत्रात दावा केलेल्या ९३८४००० रुपयांच्या शिक्षण उपकर कपातीची परवानगी नाकारल्यामुळे हा दंड आकारण्यात आला' असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, 'याचा कंपनीच्या कामकाजात कुठलाही परिणाम होणार नाही' असे स्पष्ट करण्यात आले आहे.






