Monday, November 17, 2025

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे. रविवारी दुपारी बालेकिल्ल्या जवळील परिसरात ही घटना घडली. तर झालं असं की गडावर काही माकडे दगडांसोबत खेळत होती, ती पळत असताना एक दगड घरंगळत खाली आला. आणि महिलेच्या डोक्यात पडला. स्थानिकांच्या मदतीमुळे महिलेला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली प्राथमिक उपचारानंतर तिला मोठ्या रुग्णालयात पाठविण्यात आले.

वर्षा हुंडारी ( वय ३८ वर्ष ) या मुंबईवरून वीस महिलांच्या एका गटाबरोबर राजगडावर चढाईसाठी गेल्या होत्या. बालेकिल्ल्याजवळ काही माकडे खेळत होती. गडावरून खाली उतरत असताना माकडांमुळे एक दगड खाली आला, तो तरुणीच्या डोक्यात पडला. या घाटेंट त्या जखमी झाल्या.

राजगडावर चढाईसाठी आलेल्या एका डॉक्टरच्या गटाने बचाव मोहिमांचे समन्वय ओंकार ओक यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून माहिती मिळताच. किल्ल्याजवळील पहारेकरी विशाल पिलावरे, बापू सावळे, आणि दादू वेगरे यांनी स्थानिकांच्या मदतीने तरुणीला अर्ध्या तासात स्ट्रेचरवरून खाली आणले.

राजगड पोलीस स्टेशनचे हवालदार सोमेश राऊत यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्ण वाहिकेशी संपर्क साधून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. हुंडारी यांची तब्बेत ठीक असून त्यांना मोठ्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Comments
Add Comment