जामनेर : राज्यातील तब्बल २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे त्याच अनुशंघाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.
जामनेरच्या नगराध्यक्ष पदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी तसेच भाजपच्या उमेदवार साधना महाजन यांनी आज कार्यकर्त्यां समवेत शक्ती प्रदर्शन करत मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी संवाद करतेवेळी शहरात आम्ही अनेक विकास कामे केली आहेत तसेच अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी आम्हाला पुन्हा जनतेने संधी दिली की, सगळी कामे आम्ही त्वरित पूर्ण करू. तसेच विरोधकांची आव्हाने आम्ही पेलवणार कारण आमच्याकडे विकासाचे मुद्दे आहेत तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने उत्तम नेतृत्व आहे. त्यांच्या मार्फत शहराचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.






