Sunday, November 16, 2025

२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि अकासा विमानसेवा सुरू

२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो आणि अकासा विमानसेवा सुरू

मुंबई : २५ डिसेंबर रोजी नवी मुंबईच्या विमान तळावरून प्रत्यक्षात पहिले व्यवसायिक विमान उड्डाण घेणार आहे. शिवाय प्रत्यक्ष उड्डाणासाठी तिकीट नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ही बाब विमान प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. इंडिगोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणांसाठी सविस्तर योजना जाहीर केली आहे. २५ डिसेंबरपासून, इंडिगो नवी मुंबई विमानतळावरून देशभरातील १० शहरांमध्ये उड्डाणे चालवेल. यामध्ये दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, उत्तर गोवा (मोपा), जयपूर, नागपूर, कोची आणि मंगलोर यांचा समावेश आहे. एअरलाइन हळूहळू इतर शहरांमध्ये उड्डाणे वाढवण्याची योजना आखत आहे.

एअर इंडियाने नवी मुंबईवरून चालणाऱ्या उड्डाणांसाठी आधीच सविस्तर योजना जाहीर केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, एअर इंडिया २० डेली फ्लाइट्स (४० एटीएम) चालवत आहे. अकासा एअरची चार शहरांसाठी थेट फ्लाइट्स: अकासा एअर २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून थेट चार भारतीय शहरांना जोडेल. एअरलाइन पहिल्या दिवशी दिल्ली आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान पहिली फ्लाइट चालवेल. नवी मुंबईहून गोवा, कोची आणि अहमदाबादलाही फ्लाइट्स चालवल्या जातील. बुकिंग आधीच सुरू झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा