Monday, November 17, 2025

बॉलीवूडचे खलनायक प्रेम चोप्रांची तब्येत स्थिर, लीलावती रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

बॉलीवूडचे खलनायक प्रेम चोप्रांची तब्येत स्थिर, लीलावती रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांची तब्येत बरी नव्हती. वयानुसार उद्भवणाऱ्या आजारांमुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १५ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बॉलीवूडवरील अजून एक संकट टळले. यापूर्वी धर्मेंद्र यांच्या तब्येतीमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. मात्र आता बॉलीवूडमधील दोनही ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे.

प्रेम चोप्रा यांना व्हायरल इन्फेक्शन आणि वयाशी संबंधित आजारांमुळे एक आठवड्याभर रुग्णालयात उपचार सुरू होते. कार्डिओलॉजिस्ट नितीन गोखले यांच्या देखरेखीखाली प्रेम चोप्रा यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी, लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी एका निवेदनात म्हटले होते की, 'त्यांना हृदयविकार आणि व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणून त्यांच्या फुफ्फुसांवर उपचार सुरू आहेत. ते आयसीयूमध्ये नसून वॉर्डमध्ये आहेत.'

प्रेम चोप्रा यांचे गाजलेले चित्रपट

प्रेम चोप्रा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात गाजलेल्या खलनायकांपैकी एक आहेत. ६० आणि ७० च्या दशकात त्यांनी अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केलं. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये उपकार (१९६७), दो रास्ते (१९६९), कटी पतंग (१९७०), बॉबी (१९७३), दो अंजाने (१९७६), त्रिशूल (१९७८), दोस्ताना (१९८०) आणि क्रांती (१९८१) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >