भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा झाल्याच पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी यावेळी थेट पंचांना घेरत खेळ थांबवला. हा प्रकार दहाव्या षटकाच्या वेळी घडला.


भारताचा सुयश शर्मा गोलंदाजीसाठी मैदानात उतरला असताना षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ही गोष्ट घडली. यावेळी समोरून माझ सदाकत फलंदाजी करत होता. सदाकतने, सुयशच्या बॉलवर जोरात फटका मारल्याने षटकार जाईल असे सर्वांना वाटले. पण त्यावेळी तिथे नेहाल वढेरा धावत आल्याने सर्वांना वाटले की, पाकिस्तानचा फलंदाज बाद होईल. मात्र नेहलने रेषेपलिकडे जाणाऱ्या बॉलला एका हाताने मैदानाच्या आत फेकले आणि ती कॅच नमन धीरने पकडली. या कॅचमुळे भारतीय संघाने उत्साहाला सुरूवात केली.




दरम्यान, मैदानातील पंचांनी कॅच पकडली की नाही, हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांनी ही कॅच ३-४ वेळा पाहिली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजाला नाबाद घोषित केले. नवीन नियमामुळे असे बाद देता येणार नाही, असे पंच सांगत होते. पण भारताच्या खेळाडूंनी पंचांना घेराव घातला आणि सामना थांबवला. यावेळी भारताच्या प्रशिक्षकांना समजवण्यासाठी चौथ्या पंचांना मैदानात यावे लागले. या चौथ्या पंचांनी भारताच्या प्रशिक्षकांना नाबाद का दिले, त्याचे कारण सांगितल्यावर हा सामना सुरु करण्यात आला.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या