Saturday, November 15, 2025

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला जाणार आहे. नानेपाडा नाल्यावरील पश्चिम दिशेकडील एसएल रोडवरील पूल आणि मुलुंड पूर्वमधील शिव मंदिराजवळील पूल हे जुने झाल्याने ते पाडून नव्याने बांधली जाणार आहे. या पुलांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेच्यावतीने कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पूर्व उपनगरातील सर्व पुलांच्या नियमित तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सल्टींग इंजिनिअर्स यांच्या निरिक्षण अहवालानुसार 'टी' विभागातील नानेपाडा नाल्यावरील एसएल रोडवरील पूल, शिव मंदिराजवळील पूल, हे जीर्ण अवस्थेत असल्याने ते पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. "पुलाची स्थिती नाजूक आहे आणि जीर्ण अवस्थेत आहे. पुलावरील वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्याची आणि पुनर्बाधणीसाठी विचार करण्याची शिफारस केली जाते."

मुलुंड पश्चिम एस एल मार्ग येथील नानेपाडा नाल्यावरील पूल (रामगड तबेलाजवळ) पुलांची लांबी : १५.६७ मीटर पुलांची रुंदी : १४.०० मीटर

नाल्यावरील पुलाची खोली २.८६५ मीटर स्पॅनची संख्या : १ पिलरची संख्या : २ सुपरस्ट्रक्चर : आरसीसी गर्डर आणि स्लॅब

मुलुंड, पूर्व नानेपाडा नाल्यावरील शिव मंदिराजवळील पूल (रामगड तबेलाजवळ) पुलांची लांबी : ११.०० मीटर पुलांची रुंदी : १६.४५७ मीटर

नाल्यावरील पुलाची खोली २.३५५ मीटर स्पॅनची संख्या : १ पिलरची संख्या : २ सुपरस्ट्रक्चर : आरसीसी गर्डर आणि स्लॅब

Comments
Add Comment