मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरातून ट्रान्सजेंडर गँगने अपहरण केले आणि जबरदस्तीने सुरतला नेले, तिथे शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला. यानंतर मुद्दाम भिक्षा मागण्याची सक्ती केली आणि भिक्षेतून मिळालेले पैसे लुबाडून बेदम मारहाण केली. या प्रकाराने हादरलेला तरुण संधी मिळताच पळाला आणि मुंबईत परतला. मुंबईत येताच तरुणाने मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात ट्रान्सजेंडर गँग विरोधात अपहरण करणे, जबरदस्ती करणे, बेदम मारहाण करणे, विना संमती जबरदस्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया करणे, पैसे लुबाडणे अशा विविध आरोपांतर्गत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार येताच ट्रान्सजेंडर गँग विरोधात गुन्हा नोंदवला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि चार जणांना अटक केली. आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
ट्रान्सजेंडर गँगने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अपहरण केले आणि जबरदस्तीने सुरतला नेले, तिथे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला; असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. पीडित तरुण १९ वर्षांचा आहे. यामुळे तक्रार येताच पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि तातडीने तपास सुरू केल. आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून उर्वरित तीन जणांचा शोध सुरू आहे.
मुंबईत सक्रीय असलेल्या ट्रान्सजेंडर गँगने याआधी काही गुन्हे केले आहेत याचाही तपास सुरू आहे. पोलीस सर्व बाजू तपासून बघत आहेत.






