Saturday, November 15, 2025

घर जावई

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर

लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे वो भी पचतावे, खावे वोबी पस्तावे. लग्न हा एक प्रकारचा जुगार झाला आहे, ज्याला लागला तो नशीबवान आणि ज्याला नाही लागला तो कम नशिबी. लग्नांमध्ये दोन कुटुंबाचे एकत्र येणं वेगळं यांच्या शर्ती-अटी भयानक असतात. लग्न करतायेत का मार्केटमध्ये सामान खरेदी करतायेत असं आजकाल वाटायला लागले आहे.

जावेद हा आपल्या भावंडांसोबत राहत होता. त्याच्या आई-वडिलांचं फार पूर्वीच निधन झालेलं होतं. त्याच्यामुळे तो आपल्या भावांसोबत राहत होता. तीन बहिणी व पाच भाऊ असा त्याचा परिवार होता. त्याच्यामध्ये तीन बहिणींची लग्न झालेली होती व तीन भावांची लग्न झालेली होती. जावेद आणि त्याचा भाऊ सल्लू हेच लग्नाचे बाकी होते. जावेद जास्त शिकलेला नव्हता पण पोटाला पुरेल असा तो कपड्यांचा व्यवसाय करत होता. त्यामुळे आपण जोपर्यंत व्यवस्थित कमवत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही असं त्याने ठरवूनच टाकलं होतं. एका कार्यक्रमामध्ये तो आपल्या बहिणीच्या नवऱ्यासोबत गेला असता तिथे त्याची ओळख बहिणीच्या नवऱ्याच्या मावशीच्या कुटुंबाशी झाली व त्या मावशीला एक मुलगी होती. त्या लोकांनी आमच्या मुलीला मुलगा असेल, तर सांगा असं सांगितलं. त्यावेळी जावेदच्या बहिणीच्या नवऱ्याने सल्लू नावाचा आपला मेव्हणा आहे, असं सांगितलं आणि दाखवले. पण त्यांना सल्लू पसंत आला नाही म्हणून त्यांनी जावेद आपल्या मुलीशी लग्न करेल का असे विचारले. त्यावेळी जावेदने सरळ नाही असे उत्तर दिले. कारण त्याने अगोदरच ठरवले होते की, जोपर्यंत आपण व्यवस्थित कमवत नाही तोपर्यंत लग्न करायचे नाही. पण मुलगी रेहना हिला जावेद आवडला होता आणि ती त्याच्या घरापर्यंत आली. मी तुमच्याशी तडजोड करून राहील. आपण एकत्र राहू आणि ही परिस्थिती आपल्यातून संपून जाईल. माझ्याशी लग्न कर मी तुला चांगल्या प्रकारे साथ देईन. माझ्या अपेक्षा जास्त नाहीयेत. तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मरून जाईल अशा प्रकारे त्याला धमकी देऊ लागली. म्हणून जावेदने आपल्या भावंडांना झालेला प्रकार सांगितला. भावंडाने अशी जर मुलगी असेल तर तिच्याशी लग्न करू नको, असे सांगितले. पण मुलीचे वडील जावेदच्या कुटुंबाच्या मागेच लागले. कारण जावेच्या मोठ्या भावाला माहीत होते की याची जबाबदारी म्हणजे जावेची जबाबदारी कोण घेणार. कारण जावेदला अजून पूर्ण व्यवहार ज्ञानाचे काहीच माहीत नव्हते आणि तीन भाऊ आपापल्या संसारामध्ये गुंतलेले होते. याच्याबाबतीत काय झाले तर पुढे-मागे याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न त्यांनी रेहाना वडिलांना उपस्थित केला. आई-वडील नसल्यामुळे मीच त्याचे वडील असं म्हणून रेहनाच्या वडिलांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि याच्यापुढे सर्व काही मी या मुलाचे बघेन असे त्यांनी सांगितले.

जावेदकडे लग्न करण्यासाठीही पैसे जमा झालेले नव्हते, तरी रेहनाचे वडील अब्दुल याने मी खर्च करीन असे सांगितले. जावेदच्या भावाने थोडीफार मदत केली आणि अशा प्रकारे लग्न न करणाऱ्या जावेदला लग्न करावे लागले. लग्नानंतर रेहना जावेदच्या घरी राहायला आली त्यावेळी ज्यावेळेस सोबत राहणारा सल्लू हा वेगळा राहायला लागला. म्हणजे प्रत्येक भावंड आपल्या कुटुंबाला घेऊन वेगळी राहत होती. आई-वडील गेल्यानंतर जावेद आणि सल्लू एकत्र राहत होते. आता जावेदचे लग्न झाल्यामुळे सल्लू हा दुसरीकडे भाड्याने राहायला गेला. लग्न झाल्यापासून जावेद आणि रेहना हे दोघेच राहत होते. ती सतत माहेरी जात होती. आज अबूला असे झाले. उद्या अम्मीला असे झाले. असे सांगून सतत माहेरी जात असे आणि एका वर्षातच त्यांना मुलगा झाला आणि ती मुलगा झाल्यानंतर सतत माहेरी राहू लागली आणि जावेदलाही तू माझ्यासोबत माझ्याच आई-वडिलांच्या घरी राहा असे सांगू लागली. जावेदने आपल्या मुलासाठी आणि बायकोसाठी तिथे राहण्याचे मान्य ही केले पण ज्यावेळी आपली या घरामध्ये इज्जत केली जात नाहीये.

चहा संपला. पावडर आणि साखर आण. भाजी आण अशीच लहान कामे त्याला सांगायला लागली. आपण या घराचे जावई आहोत की नोकर आहोत हेच त्याला समजेना. कारण घरातल्या दोन मुलांना आणि सुनांना जावेदच्या सासऱ्याने हाकलून दिले होते आणि दोन मुली ज्या होत्या त्यांना मात्र त्यांनी घरात ठेवून घेतले होते. एका मुलीचा तीन वेळा घटस्फोट झालेला होता आणि ही जावेदची बायको रेहेना ही त्यांची दुसरी मुलगी होती आणि जावेदला आपल्याकडे ठेवून घर कामासारखी कामे त्याला सांगू लागली. त्यामुळे जावेदने आपण तिथे न राहण्याचा निर्णय घेतला आणि तो आपल्या घरी परतला. पण त्याच्यासोबत त्याची पत्नी काही आली नाही. तिला घरातल्या लोकांनी समजावून आणले. त्यावेळी थोडे दिवस ती राहिली आणि पुन्हा भांडण करून नको नको ते आरोप करून ती परत आपल्या माहेरी निघून गेली. त्यापासून ती घरी येण्यास तयारच नव्हती आणि तिने सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जावेद आणि त्याच्या कुटुंबाच्या विरुद्ध ४९८ टाकण्यासाठी पोलिसांना दबाव देऊ लागली पण जावेदचे कुटुंब एकत्रच राहत नव्हते कारण सर्व भाऊ आणि बहिणी वेगवेगळे राहत होते आणि आपापल्या संसारात रममाण होते आणि ही दोघेच नवरा-बायको होती आणि तरीही ती त्या लोकांना त्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होती. जेणेकरून या केसमध्ये त्याचे कुटुंब अडकेल, तर हा जावेद आपल्या अबूकडे राहायला येईल असे जावेच्या पत्नीला वाटत होते. पण अनेक लोकांच्या प्रयत्नाने पोलीस स्टेशनमधून जावेदच्या कुटुंबावर ४९८ पोलिसांनी केस लावली नाही कारण त्याच्यामध्ये भक्कम असे पुरावे त्यांना मिळत नव्हते. म्हणून पोलीस आपल्याला मदत करत नाहीत हे बघून जावेदच्या पत्नीने रहेनाने वकिलांच्या मार्फत Dv कोर्टामध्ये केस दाखल केली की जेणेकरून या कोर्टाच्या केसेसला घाबरून तरी जावेद आपल्या वडिलांकडे म्हणजेच माहेरी राहायला येईल आणि घरजावई होईल असे तिला वाटत होते पण जावेदने ठरवले होते कितीही काही झाले तरी मी एकटा राहीन पण मी घरजावई होणार नाही. मी जावई आहे नोकर नाही त्याच्यामुळे आपल्या पत्नी विरुद्ध लढण्यासाठी तो मनाने तयार झालेला होता. त्याला माहीत होते की आपण आपल्या पत्नीवर कोणतेच अत्याचार केलेले नाहीत आणि माझ्या कुटुंबाने तर काहीच केलेले नाही फक्त घरजावई होण्यासाठी हे त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे जावेद जाणून होता. म्हणून त्याने कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी तुम्ही आता आपल्या पत्नीच्या विरुद्ध उभे राहिला होता. म्हणून लग्न हे आजकाल लॉटरीप्रमाणे झालेले आहे. लागली तर लागली नाही तर नाही. (सत्यघटनेवर आधारित)

Comments
Add Comment