ज्ञानदीप

जीवनगंध : पूनम राणे


दिवाळीचा मोसम होता. बाजारपेठा गजबजून निघाल्या होत्या. विविध प्रकारचे फटाके व रांगोळ्यांची दुकाने थाटली होती. विद्युत रोषणाईने नगराचे सौंदर्य खुलले होते.
प्रत्येक जण दिवाळीच्या सुट्टीत काय करता येईल याचे नियोजन करत होता. यशोधन सोसायटीतील साठे कुटुंबीयांचे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन सुट्टीमध्ये आणि वाढदिवसाच्या निमित्ताने ठरलेले असायचे. अनाथ आश्रमात जाणे, अपंग आश्रमात जाणे, ग्रंथालयास भेट देणे ,गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, यावर्षी आई-वडील आणि दोन्ही मुले एकत्र बसून नियोजन करत होते.


छोटी रिया म्हणाली, ‘आई आपले घर ग्रंथालय वाटते. आपण यावर्षी पुस्तकांचे प्रदर्शन भरवायचे का ?’ ‘बिल्डिंगमधील सर्वांना या प्रदर्शनासाठी आपण आमंत्रित करायचे का?’
दिवाळीत आई, आपल्या सोसायटीतील माणसे आपल्या घरी येऊन ग्रंथ प्रदर्शन पाहतील. आपण नियोजन करू. वेळ ठरवू. रियाची कल्पना सर्वांनाच आवडली. आईला आपल्या लेकीचे फारच कौतुक वाटले.


इयत्ता सातवीत असताना आपली रिया असा छान विचार करते, याचा तिला अत्यंत आनंद झाला. आपण केलेले सुट्ट्यांचे आणि वाढदिवसाचे उत्तम नियोजन याचे सार्थक झाले याचा मनोमन आनंद रियाच्या आई-बाबांना झाला. बाबांनी व्हाॅट्सअॅप ग्रुपवर सूचना तयार करून पाठवली. सोसायटीतील चारही इमारतींमध्ये साधारणता ७२ कुटुंब वास्तव्य करीत होती.


सोसायटीतील लहान तरुण, ज्येष्ठ मंडळी मोठ्या उत्साहाने प्रदर्शनात सहभागी झाले. सोसायटीतील बऱ्याच ज्येष्ठांना काही पुस्तकं हवी होती तीही, या प्रदर्शनात त्यांना मिळाली. त्याचा त्यांना आनंद झाला आणि त्यांनी तसे बोलूनही दाखवले.


सोसायटीतील इतर लहान मुलांनी रियाच्या घरी बसूनच वाचन करायला सुरुवात केली. मोठ्या अक्षरातील लेखनाला अनुरूप असणारी चित्रं पाहून छोट्या मुलांना फारच आनंद झाला. हे पुस्तक मला घरी घेऊन जायला पाहिजे, असा हट्ट ती पालकांकडे करायला लागली. रियाच्या आई-बाबांना खूपच आनंद झाला.


आपण ही पुस्तके घरी घेऊन जाऊ शकता. मात्र पुस्तक वाचून झाल्यावर त्या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक, किंमत, पुस्तकातील गोष्टीतील पात्र पुस्तकातून कोणता बोध झाला हे लिहून आणून दाखवावे अशी अटही घालण्यात आली.


पुस्तक देवघेव करणे, तसेच मुलांनी लिहिलेले अभिप्राय वाचन करणे. ही जबाबदारी रियाच्या आजोबांनी स्वीकारली.
सोसायटीतील आजोबा आजी, काका, काकी, यांनी सुद्धा पुस्तकं घरी घेऊन जाण्यासाठी मागणी करू लागले. वेळेचे नियोजन करून सोसायटीमध्ये दर आठवड्याला पुस्तक देवघेव योजना साठे सरांच्या घरी सुरू झाली.


सोसायटीतील काही सदस्य नवीन पुस्तके आणून देऊ लागले. साठे सरांच्या घरच्या हॉलला ग्रंथालयाचे रूप आले होते.
दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने एक ज्ञानदीप लावण्याचा संकल्प साठे कुटुंबीयांचा समृद्ध झाला होता. दिवाळीच्या निमित्ताने ज्ञानाचा दिवा इतरांच्या घरीही लावला जात होता. याचे सारे श्रेय साठे कुटुंबाचे होते. सोसायटीतील लोकांनी लिहिलेल्या अभिप्राय वहीमध्ये आम्ही वृद्ध झाल्यामुळे आम्हाला इतर इतर ठिकाणी जाता येत नव्हते; परंतु साठे सरांच्या घरी पुस्तक मिळण्याची व्यवस्था केल्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वयोवृद्ध व्यक्तींकडून मिळत होत्या. अशाप्रकारे वाचनाचा संस्कार साऱ्या इमारतीवर झाला होता.


तात्पर्य :- वाचनाने समृद्ध माणूस घडू शकतो आणि अशा प्रकारचे विचार करू शकतो.

Comments
Add Comment

वंदे मातरम्’ मातृभूमीचे सन्मान स्तोत्र

विशेष : लता गुठे भारतीय संस्कृतीचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा अनेक गोष्टी मनात फेर धरू लागतात. अतिशय प्राचीन

पारिजातक वृक्ष पृथ्वीवर येण्याची कथा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पारिजातकाला स्वर्गातील वृक्ष असेही म्हटले जाते. पारिजात हा एक सुगंधी

घर जावई

क्राइम : अॅड. रिया करंजकर लग्न या संस्काररूपी संस्थेवरून तरुणांचा विश्वास उडत चाललेला आहे. शादी का लड्डू नही खावे

दुरगम घाटी दोय...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर संत कबीराचा एक दोहा आहे.... चलौ चलौ सब कोई कहै। पहुंचे विरला कोय ।। एक कनक और कामिनी । दुरगम

जीवन कर्तव्याचे माप

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे जीवन हे भोगाची जननी नसून कर्तव्याचे माप आहे. कर्तृत्व निष्ठा, जीवन कर्तृत्वाची भूमी

परमेश्वरी भावगंधर्व

विशेष : अभिजीत भूपाल कुलकर्णी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी २६ ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या नव्वदीमध्ये प्रवेश केला.