Saturday, November 15, 2025

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे. जयपूरमधील हे विधानसभा डिजीटलायझेशन व्हावे, कागदाचा वापर कमी प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. याच धर्तीवर राजस्थान विधानसभेचे सभापती बासुदेव देवनानी यांनी हे प्रमुख कार्य हाती घेतले असून राजस्थानच्या १६व्या विधानसभेचे तिसरे सत्र हे पेपरलेस आणि डिजिटल पद्धतीने संचलित केले जाणार असल्याचे राजस्थान विधानसभेचे जनसंपर्क उपसंचालक लोकेश चंद शर्मा यांनी सांगितले.

शर्मा म्हणाले की, राजस्थान विधानसभेचे कामकाज सर्वाधिक काळ चालावे यासाठी प्रयत्न केले जात असून सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात देखील त्यांना यश आले आहे. विधानसभेचे कामकाज सुरुळीतपणे चालावे यासाठी देखील महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले असल्याचे सांगितले.जयपूर हे गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामुळे राजस्थानची विधानसभा देखील गुलाबी रंगात सजली आहे. येथील आसने व इतर संसाधने देखील गुलाबी करण्यात आली आहेत. राजस्थान विधानसभा ही देशातील पहिली विधानसभा आहे.

समृद्ध संस्कृतीचे दर्शन

राजस्थान विधानसभेचे द्वार सर्वसामान्य नागरिकांना खुले करण्यात आले आहे. विधानसभेत साकारण्यात आलेले राजस्थानचे राजकीय इतिहास संग्रहालय अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हे डिजिटल संग्रहालय प्राचीन राजकीय इतिहासापासून आताच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्या कार्याची दखल घेत आहे. राजस्थानची समृद्ध संस्कृतीचे दर्शन देखील संग्रहालयातून व्यक्त होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

Comments
Add Comment