Saturday, November 15, 2025

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूकीच्या आरोपाखाली दोन एफआयआर दाखल केले आहेत.

युनिव्हर्सिटीला नोटीस पाठवून संबंधित कागदपत्रेही मागवण्यात आली आहेत. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसतसे नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात फरीदाबादची अल फलाह युनिव्हर्सिटी देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. स्फोटाचा सूत्रधार मानला जाणारा डॉ. मुजम्मिल याच्या अटकेनंतर तपास यंत्रणा कटाचे थर उलगडत आहेत.

Comments
Add Comment