‘असंभव’ वाटणारा थरार

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


अभिनय करता करता एखाद्या अभिनेत्याला दिग्दर्शक व्हावस वाटणं आपण समजू शकतो; परंतु निर्माता होणं कौतुकास्पद आहे. असाच एक अभिनेता या प्रवासातून गेला आहे, त्याचे नाव आहे सचित पाटील. सचित पाटीलची बहुआयामी अशी ओळख होतीच; परंतु ‘असंभव’ या चित्रपटात तो अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक या तिहेरी भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.


दादरच्या शारदाश्रम शाळेत सचितचे शालेय शिक्षण झाले. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याचा सहभाग असायचा. सुधा करमरकरांच्या अभिनय कार्यशाळेत त्याने भाग घेतला होता. सुलभा देशपांडेंच्या आविष्कार अभिनय कार्यशाळेत त्याने अभिनयाचे धडे घेतले. रामनाथ थरवळकरांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले. त्यानंतर त्याने रूपारेल कॉलेजमधून कलाशाखेतून पदवी प्राप्त केली. त्या कॉलेजमधून त्याला आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर भेटले. त्यानंतर त्याच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट आला, त्यावेळी एन. एस. डी.चे सत्यदेव दुबे मुंबईत आले होते. त्यांच्या ‘आधे अधुरे’ या नाटकात त्याने काम केले होते.


त्यानंतर त्याने ‘शिकस्त’ ही मालिका केली. मोहन वाघ निर्मित व वामन केंद्रे दिग्दर्शित ‘रणांगण’ या नाटकात काम केले. नंतर केस न. ९९ हे नाटक त्याने केले. त्यानंतर ‘घरकुल,’ ‘एक धागा सुखाचा’, ‘अकल्पित’ या मालिका त्याने केल्या. रवींद्र महाजनी दिग्दर्शित, ‘सत्तेसाठी काही’ या चित्रपटात त्याने नायकाची भूमिका केली होती. नंतर कल्पना लाजमीचा ‘क्यो’ हा चित्रपट त्याने केला होता. ‘रास्ता रोको’ हा चित्रपट त्याने केला. ‘साडे माडे तीन’ व ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. ‘झेंडा’, ‘सत्यवान सावित्री, अर्जुन, क्लासमेट्स, फ्रेंडस’ हे चित्रपट त्याने केले. स्टार प्रवाह वाहिनी वरील त्याची ‘अबोली’ ही मालिका खूप गाजली. ‘राधा प्रेम रंगी रंगीली’मधील अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविला होता.


सचित पाटील व नितीन प्रकाश वैद्य निर्मित ‘असंभव’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे. एक सस्पेन्स थ्रिलर असा हा चित्रपट आहे. मानसी नावाच्या मुलीला सारखे स्वप्न पडत असते की, ती झोपलेली आहे व तिच्या पोटात कोणीतरी येऊन सुरा खुपसत आहे. आदित्य देशमुख हे उद्योजक आहेत. ते नैनितालला एक स्टेडियम बांधणार असतात. मानसी त्यांच्याकडे आर्किटेक्ट म्हणून कामाला असते. जेंव्हा ते नैनितालला पोहोचतात, तेंव्हा ती स्वप्नात पाहत असलेला बंगला प्रत्यक्षात तिथे असल्याचे त्यांना आढळून येते. तेथे मग खून होतो, पुढे काय होते ते प्रत्यक्षात चित्रपटात पाहणे उचित ठरेल.


या चित्रपटातील तुझी भूमिका कोणती आहे असे विचारल्यावर सचित म्हणाला की मी आदित्य देशमुख या उद्योजकाची भूमिका साकारत आहे. मी मानसीला हर प्रकारे मदत करत असतो. तिला पडणाऱ्या स्वप्नातून तिला बाहेर काढण्याचे आश्वासन तिला देतो. त्यासाठी मानसोपचार डॉक्टरची मदत घेतो.त्यातून मानसीच्या अगोदर जन्माचा संबंध असल्याचे जाणवते.


या चित्रपटात दोन गाणी आहेत. सतीश पटवर्धन यांनी गाणी लिहिली आहेत, तर अमितराज यांनी गाण्यांना संगीताचा साज चढविला आहे. हर्षवर्धन वावरे, शिल्पा पै यांनी गाणी गायली आहेत. नैनिताल, मसुरी, मुंबई या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग झाले.जर चित्रपट चांगला असेल, तर प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतोच. त्यामुळे त्या चित्रपटाला थिएटर मिळतात. साडे माडे तीन या चित्रपटाला त्यावेळी शो वाढवून मिळाले होते, त्याच्या समोर यशराजचा चित्रपट होता असे सचितने सांगितले. निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता या तिन्ही भूमिका त्याने या चित्रपटासाठी लीलया पेलल्या आहेत. ‘असंभव’ चित्रपटातील घटनाक्रम चकित करणारा आहे. अरे हे कसं शक्य आहे? असा वाटणारा आहे. प्रेक्षकांच्या मनातील साऱ्या प्रश्नांचे उत्तर शेवटी चित्रपटातून त्यांना पाहायला मिळणार आहे. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गाठींच्या थरारात प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Comments
Add Comment

‘मी संसार माझा ...’ मालिकेतून सुरू होणार अनुप्रियाची गोष्ट

‘सन मराठी’वर ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेचा प्रोमो पाहताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘अ परफेक्ट मर्डर’मध्ये दीप्ती भागवतचा रहस्यमय प्रवास!

“हिचकॉक म्हणजे थ्रिलचा राजा! त्यांच्या कलाकृतींमध्ये असलेला गूढपणा, रोमांच आणि भीतीचा सूक्ष्म खेळ नेहमीच मला

प्रयोग क्रमांक १३३३३... आणि प्रशांत दामले...!

राजरंग : राज चिंचणकर (अरे, हाय काय आणि नाय काय...) मराठी रंगभूमीवरचे ‘विक्रमादित्य’ म्हणून सार्थ ओळख असलेले

दिग्दर्शक देखील उपेक्षितच असतो! (भाग दोन)

भालचंद्र कुबल : पाचवा वेद मागच्या लेखावरून पुढे जाताना दिग्दर्शक हा नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेत उपेक्षितच

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी

‘गोदावरी’तील समावेश कलाटणी देणारा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल गौरी नलावडे या अभिनेत्रीचा ‘वडा पाव’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गौरीचे शालेय